हळदीकुंकू झाला राजकीय कार्यक्रम; अनेक मतदारसंघात हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयाेजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 04:42 PM2024-01-13T16:42:41+5:302024-01-13T16:42:55+5:30
फक्त घरघुती पातळीवर नाही तर राज्यपातळीवर हळदीकुंकूचे कार्यक्रम हाेत आहेत.
नारायण गावस ,पणजी : साेमवारी १५ जानेवारी मकर सक्रांती असल्याने राज्यात आता हळदीकुंकूचे कार्यक्रम सुरु होणार आहेत. यासाठी महिलांनी खरेदीसाठी लगबग सुरु केली आहे. राज्यात हळदीकुंकूला आता राजकीय वळण मिळाले आहे. राजकीय नेतेही आता आपआपल्या मतदारसंघात हळदुकुंकूचे कार्यक्रम आयोजित करत असतात. आता फक्त घरघुती पातळीवर नाही तर राज्यपातळीवर हळदीकुंकूचे कार्यक्रम हाेत आहेत.
बाजारात साहित्य दाखल :
हळदीकुंकूचे बाजारात विविध साहित्य दाखल झाले आहे. नवविवाहित महिला हळदीकुंकूसाठी लागणारे मातीचे लहान मटके बाजारात विक्रीस आल्या आहेत. त्या १०० रुपये डझनने विकले जात आहेत. तसेच तिळगूळ, चणे यांची खरेदी मोठी असते. तिळगूळ १८० रुपये किलो तर चणे २०० रुपये किलाेने विकले जात आहे. त्याप्रमाणे शेवती, झेेंडूच्या फुलांनाही मागणी वाढली आहे. ही फुले २०० रुपये किलाेने विकली जात आहेत. त्याचप्रमाणे इतर वस्तू जे महिला वाटतात असे साहित्य खरेदी केले जात आहे. हळदीकुंकू आता हा मोठा उत्सव झाला आहे.
गावागावात हळदीकुंकूचे कार्यक्रम :
पूर्वी काही माेजक्याच महिला हळदीकुंकू करत होत्या आता गरीब श्रीमंत सर्वच महिला हळदीकुंकूचे कार्यक्रम करत असतात. ऐकमेकांच्या घरी जाऊन हे कार्यक्रम केले जातात. पण आता फक्त गावापर्यंतच नाही तर राज्यपातळीवर हळदीकुंकूचे कार्यक्रम होत आहेत. काही मंत्र्याच्या बायका तसेच राजकीय महिला आपल्या मतदारसंघातील महिलांसोबत हळदीकुंकूचे कार्यक्रम आयोजीत करत असतात. या मार्फत महिलांमध्ये राजकीय वार्तालाबही सादला जातो. तसेच विविध राजकीय पक्षांच्या महिला कार्यकरिणीकडून कार्यक्रम केले जात आहेत. अशा प्रकारे हळदीकुंकूचे कार्यक्रम सध्या वाढले आहेत.