वाळपई केंद्रात पावसाचे अर्धशतक, ८ जुलै पर्यंत राज्यात यलो अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 03:14 PM2024-07-04T15:14:21+5:302024-07-04T15:18:54+5:30
वाळपईत आतापर्यंत ५० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल साखळी केंद्रावर ४९.९ इंच पावसाची नोंद झाली आहे.
पणजी (नारायण गावस): राज्यात गेले ८ आठ दिवस मुसळधार सुरुच असून सर्वच भागात पावसाची जोरात हजेरी लावली आहे. राज्यात १ जून तेे आतापर्यंत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त पावसाची नाेंद झाली आहे. पुढील पाच दिवस ८ जून पर्यंत राज्य हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
वाळपई केंद्राचे अर्धशतक
राज्यात १ जून ते आतापर्यंत एका महिन्यात सर्वाधिक जास्त पाऊस वाळपई केंद्रावर नोंद झाला आहे. वाळपईत आतापर्यंत ५० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल साखळी केंद्रावर ४९.९ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर सांगे केंद्रावर ४८.६ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात पावसाचा जोर आहे.
८ जुलै पर्यंत येलो अलर्ट
राज्यात आठ जुलै पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील ५ दिवस राज्यात सर्वच भागात जाेरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेले १५ दिवस सतत जाेरदार पावस पडत असल्याने राज्यातील नद्या ओहळ वेगाने वाहत आहेत. बहुतांश नद्या तुडूंब भरुन वाहत आहे. तसेच राज्यातील धरणाची पातळीही वाढत आहे. अनेक भागात पावसाचा जाेर कायम आहे.
दाबाेळी पणजी केंद्रावर कमी पाऊस
राज्यातील गेल्या महिन्याभरात दाबोळी केंद्रावर ३५.१ इंच पावसाची नोंद झाली आहे तर राजधानी पणजी केंद्रावर ३६.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. पण सर्वाधिक जास्त पाऊस पडणाऱ्या ओल्ड गाेवा केंद्रात आता फक्त ३६.१ इंच पावसाची नाेंद झाली आहे.