खनिज घोटाळ्याप्रकरणी हरिश मेलवानीची एसआयटीकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 10:29 PM2018-06-14T22:29:03+5:302018-06-14T22:29:03+5:30
खाण घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाकडून हरिश मेलवानी यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. एसआयटीचे निरीक्षक दत्तगुरु सावंत व इतरांकडून रायबंदर येथील क्राईम ब्रँच कार्यालयात त्यांना त्यांच्या खनिज व्यवहारासंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले.
पणजीः खाण घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाकडून हरिश मेलवानी यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. एसआयटीचे निरीक्षक दत्तगुरु सावंत व इतरांकडून रायबंदर येथील क्राईम ब्रँच कार्यालयात त्यांना त्यांच्या खनिज व्यवहारासंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले.
इतर ठिकाणाहून खनिज माल आणण्यासंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली.
इतर ठिकाणाहून लोहखनिज आणून तो आपल्या नथुरमल खाणीतून उत्खनन करण्यात आलेले खनिज असल्याचे भासवून त्याची आयात करण्यात आल्याचा एसआयटीला संशय आहे. यासंबंधी काही प्रश्नांना मेलवानी यांनी उत्तरे दिली तर काही प्रश्न अनुत्तरीत राहिल्याचे एसआयटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणात त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बेकायदेशीर खनिज उत्खनन, लोहखनिजाचे बेकायदेशीर ट्रेंडिंग आणि रॉयल्टी चलनचा दुरुपयोग करण्याचे ठपके क्राईम ब्रँचने त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.