मानवी तस्करी संपली की पोलीस कारवाई थांबली? गोव्यातील महिला सुरक्षागृह झाले रिक्त
By वासुदेव.पागी | Published: November 18, 2023 07:17 PM2023-11-18T19:17:55+5:302023-11-18T19:18:20+5:30
मागील २२ वर्षात पहिल्यांदाच असा दिवस उजाडला आहे जेव्हा मेरशी येथील सरकारी सुधारगृहात एकही महिला नसल्यामुळे हे सुरक्षागृह रिक्त आहे.
पणजी : मागील २२ वर्षात पहिल्यांदाच असा दिवस उजाडला आहे जेव्हा मेरशी येथील सरकारी सुधारगृहात एकही महिला नसल्यामुळे हे सुरक्षागृह रिक्त आहे. मात्र गोव्यात अनैतिक मानवी तस्करी बंद झाल्यामुळे सुरक्षगृह रिक्त आहे की वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर पोलीस कारवाई करीत नाहीत म्हणून रिक्त आहे हा कळीचा मुद्दा ठरला आहे.
महिला सुरक्षागृहात एकही महिला नाही असे मागील २२ वर्षात कधीच झाले नव्हते. सुरक्षागृहात मुलींना आणण्याचे प्रमाणच कमी झाल्यामुळे ते रिक्त झाले आहे. वर्ष २०२० पासून हे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. वर्ष २०२३ मध्ये १ जानेवारीपासून आतापर्यंत अवघ्या १८ मुलींना ठेवण्यात आले होते. ही संख्या आतापर्यंतच्या ९ वर्षातील सर्वात कमी संख्या आहे. वर्ष २०१८ मध्ये सर्वाधिक १०२ मुलींना दाखल करण्यात आले होते. २०२० या कोविड वर्षातही ३० जणांना दाखल करण्यात आले होते.वर्ष २०२२ पासून या केंद्रात मुलींना आणण्याचे प्रमाण खूपच घटले. याचे कारण म्हणजे पोलीस कारवाई खुपच कमी झाली.
- २०१५ ८०
- २०१६ ८५
- २०१७ ७८
- २०१८ १०२
- २०१९ ८७
- २०२० ३०
- २०२१ ३८
- २०२२ १९
- २०२३ १८