फोंड्याचा हसन मुल्ला याने एकाच वेळी पार केल्या अनेक विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा
By आप्पा बुवा | Published: June 18, 2023 06:56 PM2023-06-18T18:56:24+5:302023-06-18T18:56:45+5:30
सर्वांगीण विचार करून त्याने शेवटी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे संगणक अभियांत्रिकी संदर्भात पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचे ठरवले आहे.
फोंडा : आज काल उच्च शिक्षण घेण्यासाठी खूपशी विद्यापीठे प्रवेश परीक्षा घेतात व प्रवेश परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. खास करून परदेशातील काही विद्यापीठे ह्या बाबी खूपच जागरूक असतात. त्यांच्या परीक्षा ही तशा कठीण असतात. परंतु आपल्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर शहापूर फोंडा येथील हसन मुल्ला ह्या विद्यार्थ्याने एकाच वेळी ऑक्सफर्ड ,युसीएल, सी यु एन आदी विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा पार केल्या. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला पाहिजे त्या विद्यापीठातून शिक्षण घेऊ शकत होता. परंतु सर्वांगीण विचार करून त्याने शेवटी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे संगणक अभियांत्रिकी संदर्भात पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचे ठरवले आहे.
हसन मुल्लाने येथील अल्मेदा शाळेतून दहावी केली. त्यानंतर जीविएम विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. मडगाव येथील चौगुले महाविद्यालयातून त्याने संगणक अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी त्याने परदेशात शिक्षण घ्यायचे नक्की करून विविध विद्यापीठातील प्रवेश परीक्षा दिल्या व त्यामध्ये तो चमकला सुद्धा. लगेचच तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे .हसन मुल्ला याची आई बांदोडा पंचायतीची पंच सदस्य आहे.