डोक्यावर लोखंडी सळीने हल्ला करून पत्नीचा केला खून, पोलिसांना केली आरोपी पतीला अटक

By पंकज शेट्ये | Published: May 24, 2024 06:19 PM2024-05-24T18:19:45+5:302024-05-24T18:20:44+5:30

४२ वर्षीय चाळोबा केसरकर असे आरोपीचे नाव आहे

He killed his wife by attacking her head with an iron rod, the accused husband was arrested by the police | डोक्यावर लोखंडी सळीने हल्ला करून पत्नीचा केला खून, पोलिसांना केली आरोपी पतीला अटक

डोक्यावर लोखंडी सळीने हल्ला करून पत्नीचा केला खून, पोलिसांना केली आरोपी पतीला अटक

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: शांतीनगर, मांगोरहील येथील ४२ वर्षीय चाळोबा केसरकर यांनी त्याची पत्नी वैशाली (चैताली) केसरकर हीच्या डोक्यावर लोखंडी सळीने जबरदस्त हल्ला करून तिचा खून केला. चाळोबा यांने पत्नीचा खून केल्यचे शेजाऱ्यांना समजताच त्यांनी वास्को पोलीसांना माहीती दिल्यानंतर पोलीसांनी त्वरित धाव घेऊन चाळोबाला अटक केली.

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी (दि.२४) दुपारी २.३० च्या सुमारास तो खून घडला. चाळोबा आणि त्याची पत्नी वैशाली यांचा त्यांच्या राहत्या घरात एका विषयावरून वाद निर्माण झाल्यानंतर चाळोबाने लोखंडी सळीने वैशालीच्या डोक्यावर हल्ला करून तिचा खून केला. चाळोबा ने पत्नीचा खून केल्याचे शेजाऱ्यांना समजताच त्यांनी त्वरित पोलीसांना त्याबाबत माहीती दिली. ज्या ठीकाणी चाळोबा राहतो तेथून थोड्याच अंतरावर वैशालीच्या आईचे घर असून शेजाऱ्यांनी वैशालीच्या कुटूंबियांना त्याबाबत माहीती दिली. आपण खून केल्याचे शेजारी इत्यादींना समजल्याचे चाळोबा याला कळाल्यानंतर त्यांने पळण्याचा प्रयत्न न करता तो घरातच राहीला. पोलीसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी त्वरित तेथे धाव घेऊन चाळोबा ला ताब्यात घेतला. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक आणि इतर पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेऊन वैशाली खून प्रकरणात चौकशीला सुरवात केली आहे.  चाळोबाने वैशालीचा खून का केला त्याबाबतही पोलीस विविध माध्यमाने चौकशी करत असल्याची माहीती प्राप्त झाली.

Web Title: He killed his wife by attacking her head with an iron rod, the accused husband was arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.