त्याने बारमध्ये नशेत दिली दरोड्याची कबुली!

By admin | Published: February 26, 2015 02:27 AM2015-02-26T02:27:42+5:302015-02-26T02:27:55+5:30

पणजी : दक्षिण गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये तर्रर्र झालेल्या एका ‘तळीरामा’ने साथिदाराशी बोलताना चक्क नुवे येथील राज गोम्स यांच्या

He was drunk in the bar drunk! | त्याने बारमध्ये नशेत दिली दरोड्याची कबुली!

त्याने बारमध्ये नशेत दिली दरोड्याची कबुली!

Next

पणजी : दक्षिण गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये तर्रर्र झालेल्या एका ‘तळीरामा’ने साथिदाराशी बोलताना चक्क नुवे येथील राज गोम्स यांच्या घरावरील दरोडा आपण घातल्याचे सांगितले. इतर साथिदारांकडून दरोड्यातील वाटा न मिळाल्याने आपण संतप्त झालो असल्याचेही तो बरळला. योगायोगाने याच रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने ही चर्चा ऐकली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवून नुवे दरोडा प्रकरण धसास लावले.
चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार यांसारखे गुन्हे करून पसार झालेल्या अज्ञात गुन्हेगारांना पकडणे ही काही सोपी गोष्ट नसते; परंतु पोलीस आपले कसब पणाला लावून अनेक प्रकरणांचा पर्दाफाश करत आहेत. एखाद्या गाडीची केवळ क्रमांकपट्टी पाहून ती गाडी चोरीची आहे, हे ओळखून निरीक्षक संदेश चोडणकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी कित्येक चोरीच्या गाड्या पकडल्या आहेत. नुवे येथे घरातील माणसांवर हल्ला करून दरोडा घालणारे गुन्हेगार अज्ञातच होते. मात्र, रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानावर दोघा व्यक्तींचे संभाषण पडले आणि हे संभाषणच ‘सुराग’ ठरले.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक संशयित आणि त्याचा साथिदार दक्षिण गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये दारू ढोसत बसले होते. दारूच्या नशेत बोलता बोलता ते काय बोलताहेत, याचे भानही त्यांना राहिले नाही. नुवेत दरोडा घालताना मोठी जोखिम पत्करूनही आपल्याला अपेक्षित वाटा मिळाला नाही, असे एकाचे म्हणणे होते. वाटा मिळाला नाही, तर ‘त्या’ साथिदाराला सोडणार नाही, अशी भाषा तो बोलत होता.
हे संभाषण त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कानावर पडले आणि लगेच त्या अधिकाऱ्याने नुवे प्रकरणाचा तपास करीत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या घरफोड्याविरोधी पथकाला सतर्क केले. या पथकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी पुढील काम चोख बजावले. केवळ दोन दिवसांत राहुल ज्योतिबा जाधव आणि सिद्दिकी मोहम्मद सलीम या संशयितांना गजाआड करण्यात आले. या प्रकरणातील तिसरा व मुख्य संशयित सडा तुरुंगात होता. (प्रतिनिधी)

Web Title: He was drunk in the bar drunk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.