मासेमारीसाठी नदीच्या पात्रात उतरला व जीव गमावला
By सूरज.नाईकपवार | Published: April 27, 2024 08:25 PM2024-04-27T20:25:22+5:302024-04-27T20:25:36+5:30
लोकमत न्युज नेटवर्क मडगाव: घराशेजारील नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेला असता एका इसमाचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. मॅथ्यु कुलासो (५७) ...
लोकमत न्युज नेटवर्क
मडगाव: घराशेजारील नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेला असता एका इसमाचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. मॅथ्यु कुलासो (५७) असे मयताचे नाव असून , गोव्यातील सासष्टीतील रासई लोटली येथे आज शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास जुआरी नदीच्या पात्रात ही दुर्घटना घडली. घरातून निघून गेलेला आपला पती उशिरा झालेला तरी परत न आल्याने त्याची पत्नी तेथे गेली असता, तिला आपला पती बुडाल्याची खबर अन्यजणांकडून मिळाली.नंतर तिने हंबरडाच फोडला. लागलीच स्थानिकांनी यासंबधी मायणा कुडतरी पोलिस ठाण्याला कळविले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. वेर्णा अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आले. दलाचे जवानांनी घटनास्थळी जाउन शोध कार्यास सुरुवात केली असता. मयताचा मृतदेह नंतर या जवानांनी पाण्याबाहेर काढला. ज्या ठिकाणी त्याचा मृ़त्यू झाला होता तेथून जवळच त्याचा मृतदेह सापडला.
मयताचे घर नदीच्या पात्राच्या शेजारीच आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.तो एका गॅरेजमध्ये वेल्डर म्हणून कामाला होता. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसन्न भगत पुढील तपास करीत आहेत.