तेरेखोल किनारी सुरक्षा पाेलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबलला अटक
By पूजा प्रभूगावकर | Published: April 16, 2024 05:08 PM2024-04-16T17:08:13+5:302024-04-16T17:08:51+5:30
भ्रष्टाचार विरोधी पथकाने तेरेखोल किनारी सुरक्षा पाेलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल उदयराज कळंगुटकर याला अटक केली आहे.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: हरमल येथील एका ॲडव्हेंचर स्पाेर्ट्स व पॅराग्लाईडिंग ऑपरेटर कडून लाच मागणे तसेच त्याची सतावणुक (एसीबी) केल्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाने तेरेखोल किनारी सुरक्षा पाेलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल उदयराज कळंगुटकर याला अटक केली आहे.
या लाच प्रकरणात झालेली ही दुसरी अटक आहे.या लाच प्रकरणात कळंगुटकर याचाही समावेश असल्याचे समोर आल्यानंतर एसीबीने ही कारवाई केली.यापूर्वी तेरेखोल किनारी सुरक्षा पाेलिस स्थानकाचे निलंबित हेड कॉन्स्टेबल संजय तळकर याला एसीबीने शुक्रवारी अटक केली होती.
हरमल येथील एका ॲडव्हेंचर स्पाेर्ट्स व पॅराग्लाईडिंग ऑपरेटर कडे पैसे मागितल्याप्रकरणी एसीबीने तळकर विरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर अटक होईल या भीतीने त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. लाच प्रकरणी पोलिस खात्याने त्याला सेवेतून निलंबित केले होते. मात्र हा अर्ज फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.