आरोग्य खात्याकडून डेंग्यू जनजागृतीवर भर, अधिकाऱ्यांची नेमणूक करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 03:44 PM2024-04-21T15:44:06+5:302024-04-21T15:44:25+5:30
शनिवारी राज्यात पाऊस पडल्याने यंदा पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढू नये. यासाठी आरोग्य खात्याने या वर्षी विविध जनजागृती मोहिमेचे कार्यक्रम आयोजित केले होते.
- नारायण गावस
पणजी : गेल्या वर्षी वास्को, मडगाव तसेच इतर काही प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने यंदा आरोग्य खाते सतर्क झाले असून आतापासून जनजागृती मोहीम सुरु केल्या आहेत. आरोग्य खात्याने यंदा खास प्रत्येक सरकारी खात्यातील नोडल अधिकाऱ्यांची पाहणीसाठी नेमणूक करणार आहे. आरोग्य खात्याने सर्वच खात्यांना तसे निवेदन दिले आहे.
शनिवारी राज्यात पाऊस पडल्याने यंदा पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढू नये. यासाठी आरोग्य खात्याने या वर्षी विविध जनजागृती मोहिमेचे कार्यक्रम आयोजित केले होते. यात स्थानिक पातळीवर पंच सरपंच तसेच नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम घेतले. तसेच वाड्यावस्तींवर लोकांना पाणी साचवून ठेऊ नका असे सांगण्यात आले. तसेच खात्याने काही कामगाराच्या सहकार्याने विविध झोपडपट्टीतील परिसर तसेच इतर भागात पाहणी करुन उघड्यावर फेकण्यात येणारे टायर, तसेच इतर वस्तू गोळा करुन त्या साफ केले आहेत. तसेच शहरात लोकांकडून गॅलरीतील कुंड्यामध्ये पाणी साचवून ठेऊ नका असे सांगितले आहे.
आरोग्य खात्याचे पदाधिकारी डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या आरोग्य खात्याने राज्यातील गावात तसेच शहरातील भागात पाहणी सुरु असून ज्या विहीरीमध्ये पाणी आहे ते वापरण्यात येत नाही अशा विहीरीमध्ये डेंग्यूचे अंडी खाणारे मासे टाकण्यात आले आहे. तसेच इतर काही ठिकाणी फवारणी करणेही सुरु आहे. त्यामुळे या वर्षी डेंग्यूचा फैलाव रोकण्यासठी खाते सर्कत आहे.