गोव्यातीस सेक्स स्कॅण्डल प्रकरणी वकिलाच्या अटकपूर्व जामिनावर 11 रोजी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 04:39 PM2017-12-09T16:39:05+5:302017-12-09T16:41:22+5:30

मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांच्या कथित सेक्स स्कॅण्डलप्रकरणी गोव्याचे एक वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यानी अटकपूर्व जामिन अर्ज मिळविण्यासाठी धाव घेतल्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामिनावर उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या 11 रोजी सुनावणी ठेवली आहे.

Hearing on the anticipatory bail of advocates on sex scandal in Goa | गोव्यातीस सेक्स स्कॅण्डल प्रकरणी वकिलाच्या अटकपूर्व जामिनावर 11 रोजी सुनावणी

गोव्यातीस सेक्स स्कॅण्डल प्रकरणी वकिलाच्या अटकपूर्व जामिनावर 11 रोजी सुनावणी

Next

पणजी - मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांच्या कथित सेक्स स्कॅण्डलप्रकरणी गोव्याचे एक वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यानी अटकपूर्व जामिन अर्ज मिळविण्यासाठी धाव घेतल्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामिनावर उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या 11 रोजी सुनावणी ठेवली आहे. गेले काही दिवस गोव्यात हे प्रकरण विविध कारणांमुळे व विविध दृष्टीकोनांमधून गाजत आहे.

मंत्री पालयेकर यांच्यावर एका कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणी आयरिश रॉड्रीग्ज यांनी आरोप केले होते. पालयेकर हे प्रकरणात गुंतले असल्याचे रॉड्रीग्ज यांनी म्हटले होते व या प्रकरणी एका महिलेचे छायाचित्रही त्यांनी फेसबुकवर अपलोड केले होते. यामुळे चिडून महिलेने, तिच्या पतीने व अन्य काहीजणांनी मिळून रॉड्रीग्ज यांच्या कार्यालयात प्रवेश केला व रॉड्रीग्ज यांच्याशी त्यावेळी बाचाबाची झाली. तसेच रॉड्रीग्ज यांच्या अंगावर शाईही मारण्यात आली. यामुळे रॉड्रीग्ज यांनी आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलिसांत केली. तसेच त्या महिलेने आयरिश यांनी आपला

लैंगिकदृष्ट्या छळ केल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी आयरिशविरुद्ध एफआयआर नोंद केला.  याच काळात तारा केरकर यांच्या सवेरा नावाच्या महिला संघटनेने आयरिशविरुद्ध निदर्शने केली. आयरिश यांच्याविरुद्ध अनेक गंभीर आरोप तारा केरकर व इतरांनी करून त्यांच्या अटकेची मागणी केली. आयरिश हे महिलांची नाहक बदनामी करतात अशा प्रकारचा प्रमुख आरोप होता. 

अंजुना पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी. एल. पाटील यांनी आयरिशला समन्स पाठविले व पोलीस स्थानकावर बोलावून घेऊन त्याची जबानी नोंदवून घेतली. आपण कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही किंवा कोणताही कायदा मोडलेला नाही, असे आयरिश यांचे म्हणणे आहे. आपल्या अटकेसाठी मंत्री प्रयत्न करत असल्याचाही त्यांचा दावा आहे. 
सरकारने हे प्रकरण चौकशीसाठी अंजुना पोलिसांकडून काढून क्राईम ब्रँचकडे तपासासाठी दिले. क्राईम ब्रँचने आयरिश याना समन्स पाठविले. आयरिश यांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली एखाद्या पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी काम करून घ्यावे, अशी विनंती न्यायालयास केली होती. त्याबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाच क्राईम ब्रँचकडून दोन समन्स पाठविण्यात आल्यानंतर रॉड्रीग्ज यांनी अटकपूर्व जामिनासाठी  गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने क्राईम ब्रँचला नोटीस पाठवून शनिवारी मत विचारले होते. क्राईम ब्रँचने आपले म्हणणो शनिवारी न्यायालयास कळविले. रॉड्रीग्ज यांच्याविरोधात ज्या कलमांखाली गुन्हा नोंद झाला आहे, ती सगळी कलमे जामिनपात्र असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी स्पष्ट केले. यामुळे आता 11 रोजी सुनावणी होणार आहे.
 

Web Title: Hearing on the anticipatory bail of advocates on sex scandal in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.