गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार, रविवारी रेड अलर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 03:04 PM2024-06-21T15:04:53+5:302024-06-21T15:05:06+5:30
गेले दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे.
- नारायण गावस
पणजी: राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यात वर्तविली असून रविवारी २३ रोजी राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेले दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे.
गेल्या २४ तासांत सर्वात जास्त पाऊस वाळपई केंद्रावर नोंद झाला आहे वाळपईत गेल्या २४ तासांत १०.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर साखळी केंद्रात २४ तासांत ६.९ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर फोंड्यात ४ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर दक्षिण गाव्यापेक्षा उत्तर गोव्यात गेल्या २४ तासात सर्वात जास्त पाऊस झाला आहे.
सर्वाधिक पाऊस साखळीत
राज्यात १ जून ते आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस साखळी केंद्रावर नोंद झाली आहे. साखळीत आतापर्यंत २६.७ इंच पावसाची नोंद झाले आहे. तर त्याच्या खाली मडगावात २५.३ इंच पावसाची नाेंद झाली आहे. राजधानी पणजीत २०.५ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी फोंडा केंद्रावर झाली असून येथे १५.४ इंच पावसाची नाेंद झाली आहे तर म्हापसा केंद्रात १६.८ इंच पावसाची नोंद झाली आहे.