राज्यात पावसाचे झोडपणे सुरूच, काणकोणात कहर; नद्या भरल्याने पूरसद्रृष्य स्थिती
By वासुदेव.पागी | Updated: July 16, 2024 16:52 IST2024-07-16T16:51:25+5:302024-07-16T16:52:28+5:30
केवळ काणकोणातच ७ इंचाहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे एकूण हंगामी सरासरी पाऊस ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ४५ टक्क्यांहून अधिक पाऊस आतापर्यंत पडला आहे.

राज्यात पावसाचे झोडपणे सुरूच, काणकोणात कहर; नद्या भरल्याने पूरसद्रृष्य स्थिती
पणजीः पावसाचे धुंवाधार झोडपणे सुरूच असून मंगळवारी सकाळी८.३० पर्यंतच्या २४ तासात राज्यात सरारसी ५ इंच पाऊस पडला. केवळ काणकोणातच ७ इंचाहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे एकूण हंगामी सरासरी पाऊस ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ४५ टक्क्यांहून अधिक पाऊस आतापर्यंत पडला आहे.
जुलै महिना हा पावसाचा नवीन उच्चांक नोंदविण्याडे वाटचाल करीत असून आतापर्यंत या महिन्यात जवळ जवळ ४८ इंच पाऊस पडला आहे. अजूनही या महिन्याचे १५ दिवस शिल्लक आहेत. राज्यात मान्सून खूप सक्रिय झालेला आहे. अशा परिस्थितीत अजूनही भरपूर पाऊस पडण्याची श क्यता आहे. सोमवारी रात्री ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० दरम्यानच्या २४ तासात ५ इंचाहून अधिक पाऊस पडला. उत्तर कन्नड जिल्ल्ह्यावर पावसाचे ढग दाटलेले आढळल्यामुळे या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली होती. त्याचा परिणाम गोव्यातील दक्षिण सीमेवरी काणकोण तालुक्यातही झाला आहे. काणकोणात २४ तासात ७ इंच इतका पाऊस पडला. या भागातील गालजीबाक आणि तळपण नदी दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरण्याचेही प्रकार घडले आहेत. एकंदर पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. अजूनही पावसाच्या सरी सुरूच आहेत.
जोरदार पावसामुळे राज्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. अंंजुणे धरमातून पाणी सोडणे सुरू केले आहे. साळावली धरण, चापोली धऱण, आमठाणे धऱण, पंचवाडी धरण आणि गावणे धरण यापूर्वीच भरली आहेत.