गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:41 PM2019-09-07T18:41:44+5:302019-09-07T18:54:40+5:30
गोव्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पणजी: गोव्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच राज्यात 141 इंचांपेक्षा जास्त मोसमी पावसाची नोंद आतार्पयत झाली आहे. त्यामुळे गोव्यात पाच दिवसांचा गणोशोत्सव संपला तरी, पावसाचे विसजर्न मात्र झालेले नसल्याचे चित्र दिसून येते.
2010 साली 141.80 इंच पाऊस राज्यात पडला होता. त्यानंतर आता पाऊस 142 इंचांर्पयत पोहचला असून पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच व्यक्त केला आहे. तसेच जुलै महिन्यात जसा पाऊस पडतो, तसाच पाऊस आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडताना दिसून येत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. तसेच उत्तर गोव्यातील वाळवंटी व अन्य नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. सिंधुदुर्गमधील तिळारी धरणाचे पाणी देखील अधूनमधून सोडले जात आहे. त्यामुळे बार्देश, डिचोली व पेडणोतील नद्यांच्या किनारी असलेल्या गावांना काळजी घ्यावी लागत आहे. साखळीतील वाळवंटी ही म्हादई नदीची उपनदीची पाण्याची पातळी 4.80 मीटर्पयत पोहचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर डिचोलीत 3.50 मीटर्पयत पाण्याची पातळी पोहचल्याने साखळी पंपांचा वापर करून पाणी कमी करावे लागलत आहे.
त्याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या काळातही गोव्यात पावसाने जोरदार बॅटींग केल्याने दीड दिवसांच्या गणपतीचे विसजर्न करताना तर गोमंतकीयांना खूपच गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. तसेच मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.