राज्यात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती; ठिकठिकाणी झाडांची पडझड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 04:23 PM2024-06-09T16:23:22+5:302024-06-09T16:24:19+5:30
तसेच हवामान खात्याने लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे...
नारायण गावस -
पणजी: राज्यात शनिवारी आणि रविवार मुसळधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तसेच हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केल्याने पावसाचा जोर कायम राहणार आहे. कुठलाच अनुसुचित प्रकार घडल्यास आपत्कालीन विभागाने हेल्पलाईन क्रमांक ( ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३९८, ०८३२२७९४१००) जारी केला आहे. तसेच हवामान खात्याने लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
२४ तासांत मडगावात ६ इंच पाऊस
काल शनिवार पासून पावसाने जाेर धरला आहे. उत्तर गाेव्यापेक्षा दक्षिण गोव्यात पावसाचा जोर मोठा आहे. गेल्या २४ तासांत दक्षिण गोव्यापैकी मडगावात सर्वाधिक जास्त पाऊस पडला. गेल्या २४ तासांत मडगावात ६ इंच पावसाची नोंद झाली आहे तर काणकाेणात ३.५ इंच पावसाची नाेंद झाली आहे. राजधानी पणजीत गेल्या २४ तासांत २ इंच पावसाची नाेंद झाली आहे. आजही पावसाचा जोर कायम असणार आहे. तर पुढील दाेन दिवस राज्यात ऑरेज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे.
अनेक ठिकाणी आला पूर
दाेन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. पणजी शहरात तर अनेक रस्त्यावर पाणी साचले होते. काही नद्यांना पूरही आला. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही लोकांच्या घरात पावसाच्या पुराचे पाणी गेले होते. गेले दाेन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लाेकांची तारांबळ उडाली. राज्यातील शहरापासून ग्रामीण भागातही पूरस्थिती निर्माण झाली होती.
ठिकठिकाणाी पडझड
जाेरदार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाण माेठी पडझड झाली. माेठ्या प्रमाणात रस्त्यावर तसेच लोकांच्या घरावर झाडे तसेच झाडाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी वीज खांबही पडले हाेते. काही ठिकाणी झाडे तसेच फांद्या गाड्यावर पडून गाड्यांचे मोठे नुकसान हाेण्याच्या घटना घडल्या. या पडझडीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दल तसेच आपत्कालीन विभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनांचा आढावा घेतला.
सतर्क राहण्याचा इशारा
राज्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात रेड अर्लट
जारी असल्याने आज जाेरदार पावस पडत आहे. अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे नदी नाले तलाव तसेच समुद्र किनारी न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बहुतांश भागात नद्यांना आता पूर यायला लागला आहे.