मुसळधार पाऊस शतकाच्या वाटेवर; आतापर्यंत ९६.९ इंच पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 03:32 PM2024-07-19T15:32:56+5:302024-07-19T15:34:07+5:30
जून पेक्षा जुलै महिन्यात पावसाचा जोर जास्त वाढला आहे. जुलै महिन्यात पाऊआने साठी गाठली आहे.
पणजी: राज्यात गेला महिन्याभरात पडत असलेल्या मुसळधार पाऊस शतकाकडे पाेहचत आला आहे. राज्यात १ जून ते १९ जुलै पर्यंत एकूण ९६.९७ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण हे ५६.९ टक्यांनी अधिक आहे. तर वाळपईत सर्वाधिक जास्त ११२.४ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मुसळधार पाऊस सुरुच आहे. जून पेक्षा जुलै महिन्यात पावसाचा जोर जास्त वाढला आहे. जुलै महिन्यात पाऊआने साठी गाठली आहे. राज्यात जून महिन्यात ३८ इंच पाऊस झाला आहे. तर जुलै महिन्याच्या १९ दिवसात ५९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. पाऊस सुर झाल्यापासून पावसाने अजून विश्रांती घेतलेली नाही..
राज्यात अजूनही रेड अलर्ट
राज्य हवामान खात्याने राज्यात अजूनही रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच उद्या शनिवारी राज्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सतत पडत असलेल्या या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पावसामुळे नद्या धरणे सर्व तूडूंब भरली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शेतीबागायतीची हानी झाली आहे.