पर्यटनासाठी गोवा सरकार अन् मेक माय ट्रीपची ऐतिहासिक भागिदारी

By किशोर कुबल | Published: February 22, 2024 02:42 PM2024-02-22T14:42:54+5:302024-02-22T14:43:50+5:30

शाश्वत पर्यटनवाढ साध्य करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार

Historic partnership between Government of Goa and Make My Trip for tourism | पर्यटनासाठी गोवा सरकार अन् मेक माय ट्रीपची ऐतिहासिक भागिदारी

पर्यटनासाठी गोवा सरकार अन् मेक माय ट्रीपची ऐतिहासिक भागिदारी

किशोर कुबल/पणजी

पणजी : गोव्याचे पर्यटन खाते आणि मेक माय ट्रिप यांच्यात महत्त्वाचा सामंजस्य करार झाला असून इको टुरिझम प्रकल्प व इतर गोष्टीमुळे शाश्वत पर्यटनवाढ साध्य करण्यासाठी भागीदारी मैलाचा दगड ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. डिजिटल इनोव्हेशन आणि मार्केटिंगमधील आपले कौशल्य वापरामुळे पर्यटनाचा आवाका आणि आकर्षण आणखी व्यापक करण्यात मदत होईल.

कराराचे वैशिष्ट्य म्हणजे, शाश्वत पर्यटनासाठी वचनबद्धता, पर्यटन रोडमॅप व शाश्वत विकास उद्दिष्टांशी संरेखित करणे हा आहे. मेक मायट्रिप चा सहभाग राज्यातील अभ्यागतांसाठी प्रोत्साहन देईल.गोव्याने होमस्टे धोरणाचा मसुदा तयार केला आहे. गोवा सरकारच्या सहकार्याने, कंपनी सार्वजनिक कला प्रदर्शन तयार करण्यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त एकदा वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरणार आहेत‌. जे पर्यावरण संरक्षणाचे प्रतीक आणि पर्यटनातील शाश्वत पद्धतींच्या महत्त्वाची स्पष्ट आठवण करून देणारे आहे.

पुढील ३६ महिन्यांत अध्यात्म, स्वदेशी, सभ्यता आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद या चार मार्गांनी पर्यटन वाढवले जाईल. सांस्कृतिक जतन आणि सामुदायिक सक्षमीकरणाला आणि जागरूक पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे खात्याचे ध्येय आहे. एकादशा तीर्थ किंवा परिवर्तनाची अकरा ठिकाणे स्थानिक समुदायांभोवती केंद्रित आहेत. विशेषत: महिला आणि तरुण आणि भारतातील प्रवास आणि पर्यटन क्षेत्राला पर्यावरण आणि मानवी लोकसंख्येला फायदेशीर ठरणाऱ्या देखरेख पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही ठिकाणे आहेत. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी हा सामंजस्य करार केवळ एक करार नसून, भविष्यातील पिढ्यांसाठी गोव्याच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन करण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टाचा भाग असल्याचे म्हटले आहे. पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपाका,मेक माय ट्रिपचे सह-अध्यक्ष आणि ग्रुप सीईओ राजेश मॅगोव्ह यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Web Title: Historic partnership between Government of Goa and Make My Trip for tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.