मी घेतलेल्या निर्णयांची इतिहासही नोंद घेईल: मुख्यमंत्री, प्रत्येक निर्णयाबद्दल मला अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 01:01 PM2024-10-07T13:01:53+5:302024-10-07T13:02:45+5:30
लप म्हणाले की, 'मुख्यमंत्री सावंत यांना मी कुठेच कमी लेखत नाही. ते चांगले काम करत असून त्यांनी अशाच प्रकारे पुढेही काम चालू ठेवावे.'
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात हिरवाईचे रक्षण करण्यासाठी मी जे काही निर्णय आजवर घेतले ते सर्वच जगजाहीर झालेले नाहीत. परंतु या निर्णयांची नोंद इतिहासात कायम राहील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. काल डिचोली येथे एका कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. हिरवाईचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाबद्दल मला अभिमान आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा प्रशासकीय पातळीवर घेतले जाणारे निर्णय लोकांपर्यंत पोचतातच असे नाही. काही निर्णयांबद्दल लोक अनभिज्ञही असतील. गोव्याची हिरवाई सुरक्षित राखण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे व याच भावनेतून काही निर्णय मी वेळोवेळी घेतलेले आहेत व त्याची नोंद इतिहासात कायम राहील, असा विश्वास मला वाटतो.'
'मुख्यमंत्री चांगले काम करतात'
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप हेही या सोहळ्ळ्याला उपस्थित होते. खलप म्हणाले की, 'मुख्यमंत्री सावंत यांना मी कुठेच कमी लेखत नाही. ते चांगले काम करत असून त्यांनी अशाच प्रकारे पुढेही काम चालू ठेवावे.'