भरधाव कारची धडक; युवक हवेत उसळून थेट मांडवी नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 01:50 PM2024-02-23T13:50:50+5:302024-02-23T13:51:56+5:30

रेन्ट ए कार गती या अपघाताचे कारण ठरल्याचे पोलीस सांगतात

hit by a speeding car youth jumped into the air and directly into the mandovi river | भरधाव कारची धडक; युवक हवेत उसळून थेट मांडवी नदीत

भरधाव कारची धडक; युवक हवेत उसळून थेट मांडवी नदीत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मांडवी पुलावर रेट ए कार चालकाने निष्काळजीपणे गाडी चालविताना दुचाकीस्वाराला दिलेल्या जबर धडकेत दुचाकी चालक उसळून थेट मांडवी नदीत फेकला गेला, जावेद सडेकर (वय ३८, रा. वांयगीणवाडा- नास्नोडा) असे त्याचे नाव असून शोध घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

काल, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. रेन्ट ए कार गती या अपघाताचे कारण ठरल्याचे पोलीस सांगतात, कारने दुचाकीला इतक्या जोरात ठोकर दिली की चालक वेगाने उंच हवेत फेकला गेला आणि नंतर तो मांडवीत पडला. त्यानंतर त्याला शोधण्याचे खूप प्रयत्न झाले. अंकित त्रिपाठी (रा. ओरीसा) असे कार चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवी पुलावर भरधाव रेन्ट कॅबने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकी चालक पुलावरुन नदीत पडला. नदीत पडलेल्या दुचाकी चालकाचा शोध घेण्यासाठी बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरु आहे. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, नौदल आणि तटरक्षक दलाला सेवेत आणण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचाही शोधकार्यासाठी वापर केला जात आहे. तसेच खोल समुद्रात शोधण्यासाठी नौदलाच्या गोताखोरांनाही पाचारण करण्यात आले आहे. दुचाकीस्वाराची पाण्यावर तरंगणारी हेल्मेट तेवडी सापडली आहे. दुचाकीस्वार सापडला नसल्यामुळे तो कोण होता हेही समजू शकलेले नाही. या अपघातामुळे पुलावर वाहतूकही रखडली आहे. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

असा झाला अपघात 

अंकित त्रिपाठी (रा. औरीसा) हा कारने पणजीहून पर्वरीच्या दिशेने वेगाने जात होता. त्याचवेळी दुचाकीवरुन जावेद सडेकर (रा. हळदोणा) विरुध्द दिशेने येत होता. भरधाव जाणाऱ्या अंकीत याचा ताबा सुटून त्याने जावेदला जोरदार ठोकर दिली. यात जायदे दुचाकीवरून उंच फेकला गेला आणि मांडवी नदीत पडला.

कदंब बसच्या धडकेत पादचारी ठार

पणजीहून मडगावला जाणाऱ्या कदंब बसने बांबोळी येथील होली क्रॉस चर्चजवळ बुधवारी रात्री पादचायाला धडक दिली, जखमी अवस्थेत त्याला गोमेकॉत दाखल केले असता उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. गोपाळ गावकर (वय ८३, रा. सालेली- सत्तरी) असे त्याचे नाव आहे. रस्ता ओलांडत असतानाच कदंबची धड़क बसली. या प्रकरणात आगशी पोलिसांनी कदंब चालक राजू गावकर याच्याविरोधात गुन्हा नोंद करत त्याला अटकही केली आहे.
 

Web Title: hit by a speeding car youth jumped into the air and directly into the mandovi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.