गोव्यात 980 कोविड रुग्णांची घरीच सोय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 03:30 PM2020-08-12T15:30:19+5:302020-08-12T15:32:00+5:30
राज्यातील खासगी इस्पितळांनीही काही कोविड रुग्णांवर उपचार करायला हवेत असे सरकारने ठरविले होते. त्यानुसार चार खासगी इस्पितळे तयार झाली. मणिपाल, अपोलो, हेल्थवे, एसएमआरसी वास्को ही चार इस्पितळे कोविड रुग्ण स्वीकारू लागली आहेत,
पणजी : राज्यातील 980 कोविडग्रस्तांना त्यांच्या घरीच राहण्याची मुभा सरकारने दिली आहे. त्यांना घरीच उपचार दिले जातात व ऑनलाईन पद्धतीने त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचीही यंत्रणा आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले. राज्यातील चार खासगी इस्पितळांनी कोविड रुग्णांना उपचारांसाठी स्वीकारणो मान्य केले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ज्यांच्या घरी स्वतंत्रपणे राहण्याची सुविधा आहे, अशाच रुग्णांना घरी राहण्यासाठी मान्यता दिली जाते. कोविडची लक्षणो न दाखविणाऱ्या रुग्णांसाठीच ही सुविधा आहे.
राज्यातील खासगी इस्पितळांनीही काही कोविड रुग्णांवर उपचार करायला हवेत असे सरकारने ठरविले होते. त्यानुसार चार खासगी इस्पितळे तयार झाली. मणिपाल, अपोलो, हेल्थवे, एसएमआरसी वास्को ही चार इस्पितळे कोविड रुग्ण स्वीकारू लागली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. फोंडय़ाच्या नव्या कोविड इस्पितळात 27 कोविड रुग्णांना हलविण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
कोविड रुग्ण संख्या जेवढी वाढते तेवढा वाढीव निधी केंद्र सरकार गोव्याला देते असा चुकीचा समज काहीजण पसरवत आहेत. केंद्र सरकारने आतार्पयत फक्त सहा कोटी रुपये गोव्याला दिले आहेत पण ते रुग्णसंख्या वाढली म्हणून दिलेले नाहीत. प्रत्येक रुग्णामागे दीड लाख रुपये दिले जातात हा अत्यंत चुकीचा प्रचार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही गोव्यात चाचण्या जास्त करतो म्हणून कोविड रुग्ण जास्त संख्येने आढळून येतात. जर आम्ही चाचण्याच जास्त केल्या नसत्या तर कमी रुग्ण आढळून आले असते. देशात गोवा राज्य चाचण्यांच्याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. दहा लाख लोकसंख्येनेमागे 9क् हजार चाचण्या केल्या जातात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जर कुणाला निधी द्यायचाच असेल तर त्यांनी तो मुख्यमंत्री आपत्कालीन निधीत किंवा कोविड फंडात जमा करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, राज्यात सध्या 2 हजार 878 सक्रिय कोविड रुग्ण आहेत. 9 हजार 444 व्यक्तींना आतार्पयत कोविडची बाधा झाली व सहा हजारहून जास्त व्यक्ती कोविडच्या आजारातून ब:या झाल्या. आणखी वैद्यकीय उपकरणो वगैरे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सोडेक्सोकडे हाऊस किपिंग
खासगी उद्योगांनी चार कोविड निगा केंद्रे सुरू केली आहेत. हॉटेलांमध्ये ही केंद्रे चालतात. सरकारने राज्यातील सर्व कोविड निगा केंद्रांमध्ये हाऊस किपिंग करण्याचे व जेवण पुरविण्याचे काम सोडेक्सो कंपनीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.