गोव्यात तीन पर्यटकांचा मृत्यू; नाल्यात कार कोसळून भीषण अपघात
By काशिराम म्हांबरे | Published: December 2, 2023 11:18 AM2023-12-02T11:18:41+5:302023-12-02T11:20:58+5:30
उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेआहे.
काशिराम म्हांबरे
म्हापसा : हडफडे येथेशनिवारी पहाटे दोन वाहना दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तिघा पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक विदेशी पर्यटक गंभीररित्या जखमी झाला आहे. हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना पहाटे ३.३० च्या दरम्यान हडफडे येथील रशियन क्लबजवळ घडली. मृत्यू झालेल्या पर्यटकात महेश शर्मा( नाशिक , महाराष्ट्र) दिलीप कुमार ( हैद्रबाद) तसेच मनोज कुमार ( हैद्रबाद ) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी झालेल्या आंतोन बिचकोव्ह ( रशीया) याला उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेआहे.
हैद्राबाद तसेच नाशिक येथील पाच मित्र मिळून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. काल हे सर्व मित्र हडफडे येथील एका रेस्टॉरंटात गेले होते. तेथून पहाटे३.३० च्या दरम्यान बाहेर पडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क करुन ठेवण्यात आलेल्या गाडीत बसण्याच्या तयारीत असताना हा अपघात घडला. हे सर्व पर्यटक ज्या गाडीतून आले होते त्या गाडीतील पुढच्या सीटवर चालक तसेच एकजण बसला होता तर इतर तिघेजण मागच्या सीटवर बसण्यासाठी दरवाजा उघडला असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या दुसºया गाडीनेत्या पर्यटकांच्या गाडीला जोरदार धडक दिली. दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की मागच्या सीटवर बसण्याच्या प्रयत्नात असलेले तिघेही जण जागीच ठार झाले. धडक दिलेले वाहन विदेशी पर्यटक चालवत होता तो या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या धडकेनंतर तो विदेशी चालक आपल्या वाहनासहित रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यात कोसळला.
अपघातात दोन्ही वाहनांची बरीच नुकसानी झाली आहे
मृतांचे मृतदेह हणजूण पोलिसांनी ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी पाठवून दिले आहेत. या पर्यटकांसोबत असलेल्या इतर दोघांची जबानी पोलिसांनी नोंद करुन घेतली आहे. रशीयन चालकावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक साहील वारंग करीत आहे.