गोव्यात प्रशासनाचे वरातीमागून घोडे
By admin | Published: October 12, 2016 06:28 AM2016-10-12T06:28:18+5:302016-10-12T06:28:18+5:30
गोवा हे पर्यटकांना ३६५ दिवसही विहार करण्याजोगे जागतिक दर्जाचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे पर्यटकांची गोव्यात सतत वर्दळ सुरूच असते. मात्र
प्रसाद म्हांबरे / पणजी
गोवा हे पर्यटकांना ३६५ दिवसही विहार करण्याजोगे जागतिक दर्जाचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे पर्यटकांची गोव्यात सतत वर्दळ सुरूच असते. येथील समुद्र किनारे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते. पावसाळ््यानंतर समुद्र किनारे पर्यटकांसाठी खुले होतात, मात्र हंगाम सुरू झाल्यानंतरही अजून प्रशासनाने पुरेशा सुविधा पुरविलेल्या नाहीत. शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी झालेली नाही.
पर्यटकांच्या सोयीसाठी किनाऱ्यावर उभारण्यात येणाऱ्या शॅकचे वितरण सरकारने केलेले नाही. शॅक वितरणाला १५ आॅक्टोबरला सुरुवात होईल. त्यानंतर उभारणीसाठी किमान १५ दिवस लागतील. यंदा चांगला पाऊस झाल्याने किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर झिज झाली. त्यांचे पुर्नवसन करून पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. किनाऱ्यांवर अनेक ठिकाणी वाळू वाहून गेली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची योग्य ती व्यवस्था नाही. सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सुविधा तसेच किनाऱ्यांवर योग्य प्रमाणात वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. गोव्यात देशी पर्यटकांची वर्दळ १२ महिने असते. हे देशी पर्यटक किनाऱ्यांबरोबर निसर्गाचाही आस्वाद घेतात. विदेशातून चार्टर्ड विमानातून येणारे पर्यटन आॅक्टोबरच्या पहिल्याच दिवशी गोव्यात दाखल झालेत. त्यात रशिया तसेच इतर देशातल्या पर्यटकांचा समावेश आहे. मात्र त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा नाहीत. किनाऱ्यांवरील जीवरक्षकांच्या मदतीला किमान हंगामात तरी सुरक्षा दल गरजेचे आहे.