मुंबई-गोवा विमान सेवेत वाढ, पर्यटन व्यावसायिक आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 03:38 PM2020-09-16T15:38:39+5:302020-09-16T15:44:27+5:30

कोविड महामारीमुळे गेले सहा महिने गोव्याचे पर्यटन ठप्प होते.

hotel business rises in weekend at goa | मुंबई-गोवा विमान सेवेत वाढ, पर्यटन व्यावसायिक आशावादी

मुंबई-गोवा विमान सेवेत वाढ, पर्यटन व्यावसायिक आशावादी

Next

पणजी  - मुंबई-गोवाविमानसेवेत वाढ झाली असून राज्यातील पर्यटक व्यावसायिक त्यामुळे समाधान व्यक्त करीत आहेत. कोविड महामारीमुळे गेले सहा महिने गोव्याचे पर्यटन ठप्प होते. मंगळवारी स्पाइस जेटनेे मुंबई - गोवा अशी आठवड्याचे सर्व दिवस दुपारची विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले. त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांना दिलासा मिळालेला आहे.  मुंबईहून विमानाने येणाऱ्या देशी पर्यटकांची संख्या तशी लक्षणीय आसते.  स्पाइस जेटने जाहीर केल्यानुसार मुंबईहून येणारे विमान दुपारी १२.३० वाजता दाबोळी विमानतळावर दुपारी १ वाजून १० मिनिटांनी परतीच्या प्रवासासाठी मुंबईला जाण्यासाठी निघेल.

गोव्यात पर्यटन व्यवसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टूर अँड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, खरेतर मुंबई, बंगळुरु, हैदराबाद, दिल्लीहून पूर्वीसारखी नियमित विमानसेवा सुरू होणे पर्यटन व्यवसायिकांना अपेक्षित आहे. आम्ही नियमित विमानसेवेची प्रतीक्षा करीत आहोत. अनलॉक ४ मध्ये ६० टक्के विमाने सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. फेब्रुवारीपर्यंत रोज देशभरातून ८० विमाने  गोव्यात उतरत होती. ६० टक्के विमान सेवा सुरू करण्यास मुभा देण्यात आल्याने रोज ४८ विमानांची अपेक्षा होती परंतु अगदीच मोजकी १० ते १२ विमाने सध्या येत आहेत. इंडिगो, एअर एशिया, विस्तारा, स्पाइस जेट तसेच इतर खाजगी कंपन्यांनी विमान फेऱ्यांमध्ये वाढ करायला हवी.

शहा म्हणाले की गोव्याचे पर्यटन आता हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यवसायिक धरून आहेत परंतु त्यासाठी काही कालावधी निश्चित जाईल.स्वतःचे वाहन घेऊन येणारे देशी पर्यटक काही प्रमाणात येऊ लागले आहेत. रेल गाड्या, विमाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय गोव्याचे पर्यटन बहरणार नाही.

विकेंडला दोन ते तीन पंचतारांकित हॉटेलांमध्ये ७५ टक्के खोल्या भरल्या

निलेश शहा म्हणाले की, विकेंडला देशी पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. राज्यातील दोन ते तीन पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या विकेंडला ७५ टक्के खोल्या भरल्याचे आढळून आले. राज्यातील हॉटेल ऑक्युुपन्सीची एकूण सरासरी साधारण २० टक्के आहे.परंतु वीकेंडला पर्यटक येऊ लागले आहेत हे स्पष्ट झाले आहे.सरकारने व्यावसायिकांना काही करातून सवलत द्यायला हवी. मधल्या काळात हॉटेले,  बार अँड रेस्टॉरंट बंद होती तरीही पालिका, पंचायतींनीे कचरा कर वसूल केला. सरकारने यात हस्तक्षेप करायला हवा. व्यावसायिकांना याबाबतीत तरी सवलत मिळायला हवी'

महत्त्वाच्या बातम्या

ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र 

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्रवासी असलेली बोट उलटली; 7 जणांचा मृत्यू, 14 बेपत्ता

"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल 

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा

CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

Web Title: hotel business rises in weekend at goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.