तांदूळ कसा सडला? आम्ही चौकशी करतोय; निरीक्षक रामकृष्ण साळगावकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 08:54 AM2023-05-12T08:54:26+5:302023-05-12T08:56:19+5:30

सासष्टी तालुक्यातील वितरण थांबवले

how did the rice rot we are investigating information of inspector ramkrishna salgaonkar | तांदूळ कसा सडला? आम्ही चौकशी करतोय; निरीक्षक रामकृष्ण साळगावकर यांची माहिती

तांदूळ कसा सडला? आम्ही चौकशी करतोय; निरीक्षक रामकृष्ण साळगावकर यांची माहिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : सासष्टी तालुक्यात अळी व बुरशीजन्य तांदूळ सापडल्यानंतर नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानांना भेट देऊन धान्याची पाहणी केली. यात काही दुकानात निकृष्ट तांदूळ आढळून आला. या प्रकरणाची खात्याने गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू केलेली आहे. निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करू नये, असे निर्देश देण्यात आल्याचे दक्षिण गोवा नागरी पुरवठा निरीक्षक रामकृष्ण साळगावकर यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात पाठपुरावा करणे चालू आहे. सासष्टीत एकूण २५ स्वस्त धान्य दुकानांना खात्याकडून माल पुरविला जातो. खराब झालेला तांदूळ आहे तो बदलण्यात यावा किंवा शक्य असल्यास तांदूळ स्वच्छ करून पुरवठा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे साळगावकर यांनी सांगितले. यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नव्हता. 

तांदळात अळी व बुरशी प्रथमच सापडल्याने हे प्रकरण थक्क करणारे आहे. साधारणपणे तांदूळ ६ महिने टिकतो. सहजासहजी तांदूळ लवकर खराब होत नाही.

हा माल पूर्वीच खराब झालेला होता की, त्यानंतर हा प्रकार घडला हे सांगणे शक्य नाही, असे ते म्हणाले. अशा प्रकारचे धान्य पुरविण्याचा प्रकार कसा घडला, याची अन्न आणि औषध प्रशासनानेही दखल घेऊन चौकशी केली पाहिजे.

यापुढे निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी शक्यतो पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर धान्य पुरवण्यात येईल. तसेच यापुढे नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवले जाणार नाही, याची काळजी नागरी पुरवठा खात्याकडून घेतली जाईल, असे साळगावकर यांनी सांगितले.
 

Web Title: how did the rice rot we are investigating information of inspector ramkrishna salgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा