१० वर्षात किती मुलांना वाऱ्यावर सोडले?; बाल हक्क आयोगाने पोलिसांकडे मागवला अहवाल
By पूजा प्रभूगावकर | Published: January 30, 2024 12:57 PM2024-01-30T12:57:03+5:302024-01-30T12:57:17+5:30
मुलांना रस्त्यावर सोडून देणे हे धक्कादायक आहे. यामुळे या मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्नही निर्माण होत आहे.
पणजी: राज्यात मागील १० वर्षात किती मुलांना सोडून दिले याचा अहवाल सादर करावा अशी सूचना गोवा बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा पोलिस महासंचालकांना केली आहे. मडगाव येथे दोन लहान मुलांना कुणीतरी रस्त्यातच सोडून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची दखल घेऊन आयोगाने पोलिसांकडे अहवाल मागितला आहे.
मुलांना रस्त्यावर सोडून देणे हे धक्कादायक आहे. यामुळे या मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्नही निर्माण होत आहे. मुलांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. गोव्यात गेल्या १० वर्षात अशा प्रकारे किती मुलांना सोडून दिले ? याप्रकरणी पोलिसांनी किती गुन्हे नोंद केले ? या प्रकरणांचा तपास झाला का ?पोलिसांनी कोणती कारवाई केली ? त्या मुलांच्या पुनर्वसनासाठी कुठली पावले उचलली ? हा तपशील अहवाल स्वरुपात सादर करावा असे बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पीटर बॉर्जिस यांनी पोलिस महासंचालकांना केलेल्या पत्रात नमूद केले आहे.