महाशिवरात्री व्रत कसे साजरे करावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2024 01:31 PM2024-03-07T13:31:10+5:302024-03-07T13:31:44+5:30

संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते.

how to celebrate mahashivratri fast | महाशिवरात्री व्रत कसे साजरे करावे?

महाशिवरात्री व्रत कसे साजरे करावे?

- तुळशीदास गांजेकर

यंदा शुक्रवारी, दि. ८ रोजी महाशिवरात्र आहे, संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. प्रत्येक प्रांतानुसार त्या-त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते. हे व्रत असून, त्याचा विधी कसा करावा? ते करताना कोणत्या कृती कराव्यात? याची शास्त्रीय माहिती देण्याचा हा प्रयत्न...

महाशिवरात्र हे व्रत साजरे करण्याचे महत्त्व आणि पद्धत : देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची ३ अंगे आहेत. माघ कृष्णपक्ष त्रयोदशीला एकभुक्त राहावे, चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प कराठा, सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे, भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे.

प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग पोडशोपचारे पूजा करावी भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशेआठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी, असे महाशिवरात्रीचे व्रत आहे

शिवपूजेसाठीचे पर्याय : अ. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी. आ. शिवाचे चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. इ. यांपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा 'ॐ नमः शिवाय।' हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.' ई. मानसपूजा: स्थूलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ', हा अध्यात्माचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. जसे साध्या बॉम्बपेक्षा अणुबॉम्ब आणि त्यापेक्षा परमाणू बॉम्ब हा अधिक शक्तिशाली असतो, त्याप्रमाणे स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म गोष्टींमध्ये अधिक सामर्थ्य असते. या तत्त्वानुसार प्रत्यक्ष शिवपूजा करणे शक्य नसल्यास शिवाची मानसपूजाही करू शकतो. 'ॐ नमः शिवाय।' हा नामजप अधिकाधिक करा.

कलियुगात नामस्मरण ही साधना सांगितली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी १ सहस्र पट कार्यरत असणाऱ्या शिवतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेण्यासाठी '3ॐ नमः शिवाय।' हा नामजप अधिकाधिक करावा, यावेळी 'आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत', असा भाव ठेवावा, भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच, भगवंताच्या नामाचे उच्चारण करताना; तसेच ते नाम ऐकताना हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नामजप करावा, भगवंताच्या नामाचे उच्चारण करताना; तसेच ते नाम ऐकताना देवतेच्या तत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी नामाचा
उच्चार योग्य प्रकारे करून नामजप करावा.

देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. 'कलियुगी नामची आधार", असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे. नामाचा संस्कार मनावर रुजेपर्यंत तो मोठ्याने म्हणून करणे लाभकारी आहे. भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करताना; तसेच ते नाम ऐकताना देवतेच्या तत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. याप्रमाणे नामजप करताना तो एकाग्रतेने करावा.

 

Web Title: how to celebrate mahashivratri fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.