आज बारावीचा निकाल
By admin | Published: May 10, 2015 01:00 AM2015-05-10T01:00:23+5:302015-05-10T01:00:33+5:30
पणजी : १६,१८० विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणारा बारावीचा निकाल रविवारी सायंकाळी ४ वाजता पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या सभागृहात जाहीर केला जाणार आहे.
पणजी : १६,१८० विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणारा बारावीचा निकाल रविवारी सायंकाळी ४ वाजता पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या सभागृहात जाहीर केला जाणार आहे.
शालान्त व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो निकाल जाहीर करतील. त्याचवेळी तो इंटरनेटवरही उपलब्ध केला जाणार आहे. शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत या वर्षी १६,१८0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यात ८४८0 मुली व ७७00 मुलगे आहेत. गतवर्षीपेक्षा ही संख्या साडेतीन हजारांनी अधिक असून आतापर्यंतची विक्रमी संख्या असल्याचे शालान्त मंडळाने म्हटले आहे.
१३ मे रोजी गुणपत्रिका दिल्या जातील. बार्देस, तिसवाडी, पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा व धारबांदोडा तालुक्यांमधील हायर सेकंडरींना पर्वरी येथे बोर्डाच्या कार्यालयात, तर काणकोण, केपे, सांगे, सासष्टी व मुरगाव तालुक्यातील हायर सेकंडरींना मडगाव येथे दक्षिण शिक्षण विभागीय कार्यालयात निकाल मिळतील. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १३ मे रोजी सकाळी १0 ते दुपारी १ या वेळेत मिळतील. (प्रतिनिधी)