अंबाजी येथे कुजलेल्या स्थितीत मानवी हात सापडला: खळबळजनक घटना
By सूरज.नाईकपवार | Published: July 29, 2023 03:13 PM2023-07-29T15:13:21+5:302023-07-29T15:14:15+5:30
श्वानपथक व वैज्ञानिक तंत्राज्ञाही पाचारण करण्यात आले. मात्र हा नेमका काय गुंता आहे याचा उलगडा होऊ शकला नाही.
मडगाव: गोव्यातील फातोर्डा येथील अंबाजी येथील एका इमारतीच्या पार्किंग जागेत कुजलेल्या स्थितीत शनिवारी सकाळी एक मानवी हात सापडला.या घटनेमुळे या भागात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही संबधित ठिकाणी धाव घेतली. हा खुनाचा प्रकार की अन्य काही आहे यासंबधी पोलिसही अनभिज्ञ आहेत.
श्वानपथक व वैज्ञानिक तंत्राज्ञाही पाचारण करण्यात आले. मात्र हा नेमका काय गुंता आहे याचा उलगडा होऊ शकला नाही. भटक्या कुत्र्यांनी हा अवशेष येथे आणून टाकला असावा असा प्राथमिक कयास पाेलिसांनी व्यक्त केला आहे. तुर्त अनैसर्गिक घटना म्हणून फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणांची नोंद पोलिस दफ्तरी नोंदवून घेतली आहे.मडगाव पोलिस उपाविभागीय उपअधिक्षक संतोष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, पुढील तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सर्वकडे बिनतारी संदेश पाठवून दिले आहे असे ते म्हणाले.
या प्रकरणी पोलिसांना अजूनही कुठलेही ठोस धागेदाेरे सापडले नाहीत. संबधित इसमाचा मृत्यू काही दिवसांपुर्वी झालेला असावा व तो भंगार गोळा करणारा असावा असा असाही पोलिसांचा कयास आहे.हा घातपाताचा प्रकार आहे का याविषयीही पोलिस तपास करीत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.