राज्यात त्रिशंकू विधानसभा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 01:38 AM2017-03-11T01:38:05+5:302017-03-11T01:38:05+5:30
पणजी : विधानसभेच्या चाळीसही जागांचे निकाल काय लागू शकतात, याचा अंदाज
पणजी : विधानसभेच्या चाळीसही जागांचे निकाल काय लागू शकतात, याचा
अंदाज गुरुवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधून सर्वच राजकीय पक्षांना आला आहे. विधानसभा त्रिशंकूच असेल, असे
स्पष्ट संकेत मिळू लागल्याने युतीच्या
दृष्टीने जुळवाजुळव करण्यासाठी विविध नेत्यांची बोलणी सुरू झाली आहे.
राष्ट्रीय पक्ष आणि छोट्या प्रादेशिक
पक्षांच्या नेत्यांमध्ये मनोमीलनाच्या दृष्टीने संवाद सुरू झाला आहे.
सत्ताधारी भाजपला किंवा विरोधी काँग्रेसलाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा संदेश बहुतांश एक्झिट पोलद्वारे गुरुवारी दिला गेला आहे. भाजपमधील उत्साह त्यामुळे वाढलेला आहे. मात्र, काँग्रेसचे नेते तसेच मगोप, गोवा फॉरवर्ड व युगोपचेही उमेदवार निरुत्साही झालेले नाहीत. भाजप किंवा काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरेल व कुणाचेही सरकार अधिकारावर आले तरी आपल्याला त्यात घुसण्याची संधी मिळेल, अशी स्वप्ने काही अपक्ष उमेदवार तसेच काही छोटे पक्ष रंगवत आहेत. गुरुवारी रात्रीपासून अपक्षांनी काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना भेटून बैठका घेणेही सुरू केले.
निवडणूक निकाल जाहीर होताच, भाजप-मगोप युती पुन्हा अधिकारावर येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही संकेत मिळतात.ो