गोव्यात ईद ए मिलादच्या मिरवणुकीत अन्य धर्माच्या भावना दुखाविणाऱ्या घोषणा, गुन्हा नोंद
By सूरज.नाईकपवार | Published: October 16, 2023 12:00 PM2023-10-16T12:00:07+5:302023-10-16T12:00:47+5:30
एका महिंद्रा थार वाहनाचा चालक व अन्यजणांवर गुन्हा नोंद केला आहे.
सूरज नाईकपवार
मडगाव: गोव्यात ईद ए मिलादच्या मिरवणुकीत अन्य धर्माच्या भावना दुखविणाऱ्या घोषणा देउन सोशल मिडियावरुन त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याबद्दल दक्ष०ण गोव्यातील फातोर्डा पोलिसांनी एका महिंद्रा थार वाहनाचा चालक व अन्यजणांवर गुन्हा नोंद केला आहे.
२८ सप्टेंबर रोजी येथील रविंद्र भवन जवळ वरील घटना घडली होती. भादंसंच्या २७९, १५३ (अ) व ५०६ कलमाखाली पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गावकर पुढील तपास करीत आहेत.
संबधित वाहनाचा क्रमांक पाेलिसांना मिळाला आहे. त्या वाहन चालकाने निष्काळजीपणे आपले वाहन चालविले होते. तसेच वाहनाच्या छतावर काहीजणांना बसविले होते. ते आक्षेपार्ह घोषणा देत होते. या घोषणा अन्य धर्माच्या भावना दुखविणाऱ्या होत्या. तसेच त्याचे व्हिडीओ काढून सोशल मिडियावर ते व्हायरलही केले होते.