लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 11:23 AM2023-03-12T11:23:02+5:302023-03-12T11:23:51+5:30

लोकसभा निवडणुकीत कुणाला तिकीट द्यावे, हा निर्णय झालेला नाही.

i am not interested in the lok sabha elections said goa bjp state president sadanand shet tanavade | लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची स्पष्टोक्ती

लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची स्पष्टोक्ती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'निवडणुकीसाठी मी इच्छुक निवडणुकीवर लक्ष ठेवून राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना आपण उपस्थित लावत नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाचे काम म्हणून मी कार्यक्रमांना हजेरी नाही. त्यामुळे लावतो,' असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.

'२०२४ ची लोकसभा निवडणूक जवळ आल्याने मी राजकीय कार्यक्रमांना सक्रियपणे हजेरी लावत असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाचे काम सर्वत्र पोहोचवणे, ही जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ४० ही मतदारसंघ आपलेच आहेत', असे तानावडे यांनी सांगितले.

तानावडे म्हणाले, 'लोकसभा निवडणुका जवळ आल्याने मी उत्तर गोव्यात जास्त लक्ष केंद्रित केले आहे, हे चुकीचे आहे. निवडणुकीत मला रस असता, तर कदाचित मागील वर्षी विधानसभा निवडणूक थिवी मतदारसंघातून लढवली असती. विधानसभा, लोकसभा असो अन्य कुठलीही निवडणूक. त्या जिंकणे हे आमचे लक्ष आहे. प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना सर्व निवडणुका पक्षाने जिंकल्या, याचा मला आनंद आहे.'

याचा प्रश्नच येत नाही....

लोकसभा निवडणुकीत कुणाला तिकीट द्यावे, हा निर्णय झालेला नाही. निवडणूक जवळ आल्यानंतरच उमेदवारीबाबत ठरवले जाते. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे ज्येष्ठ नेते असून, ते चांगले काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना डावलले जात आहे का? त्यांना उमेदवारी मिळणार की नाही? हा प्रश्नच येत नाही असे तानावडे यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: i am not interested in the lok sabha elections said goa bjp state president sadanand shet tanavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा