मी कोणताही निर्णय घेईन, फ्रान्सिस डिसोझांचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:33 PM2018-11-06T18:33:37+5:302018-11-06T18:34:24+5:30

मी कोणताही निर्णय घेऊ शकतो. मला अनेक दारे उघडी आहेत, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि म्हापशाचे विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी भाजपाला इशारा दिला आहे.

I will take any decision - francis d'souza | मी कोणताही निर्णय घेईन, फ्रान्सिस डिसोझांचा भाजपाला इशारा

मी कोणताही निर्णय घेईन, फ्रान्सिस डिसोझांचा भाजपाला इशारा

Next

पणजी : मी कोणताही निर्णय घेऊ शकतो. मला अनेक दारे उघडी आहेत, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि म्हापशाचे विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी भाजपाला इशारा दिला आहे.

उद्या गुरुवारी डिसोझा यांच्या म्हापशातील निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक होत आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, राजेंद्र आर्लेकर, महादेव नाईक, माजी आमदार गणोश गावकर आदी अनेकजण या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. ही बैठक कशासाठी आहे व त्यात कोणते निर्णय होऊ शकतात असे लोकमतने मंगळवारी डिसोझा यांना विचारले असता, डिसोझा म्हणाले की मी स्वत: व्यक्तिगत पातळीवर कोणताही निर्णय घेऊ शकतो. मला विविध पक्षांची दारे उघडी आहेत. मात्र शक्य तो भाजपामध्येच राहून भाजपामध्ये बदल घडवून आणावेत असे मी ठरवले आहे.

गुरुवारी साधारणत: पहिली बैठक होईल. त्यावेळी सगळेच बैठकीला पोहोचतील असे नाही. काहीजण नंतरही भेटू शकतात. मात्र सर्वाना वाटतेय की, गोवा प्रदेश भाजपामध्ये बदल व्हायला हवेत. सध्या जे काही चाललेय ते मुळीच ठीक नाही. अन्यायकारकच जास्त घडत आहे. पक्षाच्या केडरवरही अन्याय होत आहे. मी कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे पण मला इतरांचाही विचार करावा लागेल. इतर काहीजणांची स्थिती थोडी वेगळी आहे. आम्ही पक्षातच राहून पक्षात बदल घडवून आणू, असे डिसोझा म्हणाले. यापुढे जर पक्षात व सरकारमध्ये नेतृत्व बदल करण्याची वेळ आली तर, ते नेतृत्व हे पक्षाच्या केडरमधीलच व्यक्तीकडे असायला हवे असा आमचा आग्रह आहे. पक्षात चांगले काही तरी घडेल. आम्ही गुरुवारी भेटून प्राथमिक स्वरुपाची चर्चा करू. टप्प्याटप्प्याने काही निर्णय होतील, असे डिसोझा म्हणाले.

Web Title: I will take any decision - francis d'souza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.