ढवळीकरांकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा देत असाल तर मांद्रे, शिरोड्याबाबत फेरविचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 09:12 PM2018-11-20T21:12:22+5:302018-11-20T21:13:27+5:30

मगोपचे उपाध्यक्ष रत्नकांत म्हार्दोळकर यांनी पत्रकार परिषदेच्यावेळी एका प्रश्नावर त्यांनी उत्तरादाखल ही माहिती दिली.

If Dhavalikar gets possession of the Chief Minister, then reconsideration of Mandre and Shiroda | ढवळीकरांकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा देत असाल तर मांद्रे, शिरोड्याबाबत फेरविचार

ढवळीकरांकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा देत असाल तर मांद्रे, शिरोड्याबाबत फेरविचार

Next

पणजी : सुदिन ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा दिला तरच शिरोडा आणि मांद्रे मतदारसंघात आगामी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय मगोप घेईल. पक्षाचे उपाध्यक्ष रत्नकांत म्हार्दोळकर यांनी मंगळवारी तसे स्पष्टपणे सांगितले. सध्या तरी दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढण्याबाबत पक्ष ठाम असल्याचे ते म्हणाले. 


पत्रकार परिषदेच्यावेळी एका प्रश्नावर त्यांनी उत्तरादाखल ही माहिती दिली. म्हार्दोळकर म्हणाले की,‘मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री म्हणून सुदिन ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदावा ताबा द्यायला हवा, त्याबाबत गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. सुभाष शिरोडकर यांच्या राजीनाम्यामुळे शिरोडा मतदारसंघात तसेच दयानंद सोपटे यांच्या राजीनाम्यामुळे मांद्रे मतदारसंघात पुढलि सहा महिन्यात पोटनिवडणुका होणार आहेत. या दोन्ही जागा लढण्यास मगोप सक्षम आहे आणि जिंकून येण्याचीही क्षमता पक्षाकडे आहे. परंतू सुदिन यांना मुख्यमंत्रीपदाचा ताबा मिळत असेल तर वेगळा विचार करण्यास हरकत नाही.’


शिरोडकर आणि सोपटे यांना निवडणूक लढविण्यास ६ वर्षांची बंदी घालावी तसेच पक्षांतर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सरकारी लाभाच्या पदापासून वंचित ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केलेली आहे. या याचिकेचे समर्थन करताना पक्षाचे कार्याध्यक्ष नारायण सावंत म्हणाले की, पक्षांतरबंदीला आळा बसावा म्हणून हे पाऊल उचलले आहे. मगोपच्या इतिहासात ८८ आमदारांपैकी २९ आमदारांनी आजवर पक्षांतर केले. त्यामुळे मगोप हा आमदार पुरविणारा कारखाना अशी संभावना होऊ लागली. हा डाग आम्हाला पुसून काढायचा आहे. 


मगोपचे दोन आमदारही पक्षांतराच्या हालचाली करीत आहेत, अशा बातम्या मध्यंतरी पसरल्या होत्या या आमदारांना काबूत ठेवण्यासाठी ही याचिका आहे का प्रश्नावर सावंत म्हणाले की, तसे काही नाही. मगोपच नव्हे, तर कुठल्याही पक्षाच्या आमदाराने पक्षांतर करु नये यासाठी ही याचिका सादर करण्यात आली आहे. 

Web Title: If Dhavalikar gets possession of the Chief Minister, then reconsideration of Mandre and Shiroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.