जूनमध्ये नापास, तर वर्ष मुकले
By admin | Published: May 4, 2015 01:23 AM2015-05-04T01:23:29+5:302015-05-04T01:23:39+5:30
दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्यांना म्हणजे एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहिलेले विषय त्वरित सोडविण्यासाठी आॅक्टोबरपर्यंत
वासुदेव पागी ल्ल पणजी
दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्यांना म्हणजे एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहिलेले विषय त्वरित सोडविण्यासाठी आॅक्टोबरपर्यंत वाट पाहायला न लावता जूनमध्येच परीक्षेची सोय करून विद्यार्थ्यांचा ताण हलका केला असला तरी या परीक्षेत नापास झालेल्यांचे मात्र ते वर्ष मुकणार आहे. त्यांनी अकरावीसाठी मिळविलेला प्रवेशही रद्द होणार आहे.
दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी पाच ते सहा महिने वाट पाहावी लागत होती, ती आता लागणार नाही. जूनमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय गोवा शालान्त मंडळाने घेतला आहे. या परीक्षेला मात्र विद्यार्थ्यांना राहिलेले विषय सोडवावेच लागतील. अन्यथा या शैक्षणिक वर्षात अकरावीला त्यांना प्रवेश घेता येणार नाही. एटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील; परंतु ते तात्पुरते असतील. पुरवणी परीक्षेचा निकाल लागल्यावरच निकाल पाहून ते प्रवेश कायम केले जातील. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचेच निकाल कायम केले जातील आणि नापास झालेल्यांचे रद्द केले जातील, अशी माहिती गोवा शालान्त मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी दिली. आॅक्टोबरमध्ये होणारी परीक्षा जूनमध्ये घेण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी घेतल्याचे शेट्ये यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा अभ्यास ताजा असतानाच तसेच अकरावीचा अभ्यास सुरू झालेला नसतानाच दहावीच्या राहिलेल्या विषयांची परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या सोयीचे ठरते. ६ महिन्यांनंतर परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांसाठी ते तणावाचे ठरते, असे शालान्त मंडळाचे मत आहे. (पान २ वर)