सदीक तुरूंगात राहिला असता तर जिवंत असता...! जी भिती ॲड फळदेसाई यांनी व्यक्त केली होती तेच घडले

By वासुदेव.पागी | Published: September 3, 2023 07:55 PM2023-09-03T19:55:59+5:302023-09-03T19:56:47+5:30

ज्याची भिती ॲड फळदेसाई यांनी न्यायालयात व्यक्त केली होती तेच घडून गेले आहे. 

If Sadiq had stayed in jail, he would have been alive goa news | सदीक तुरूंगात राहिला असता तर जिवंत असता...! जी भिती ॲड फळदेसाई यांनी व्यक्त केली होती तेच घडले

सदीक तुरूंगात राहिला असता तर जिवंत असता...! जी भिती ॲड फळदेसाई यांनी व्यक्त केली होती तेच घडले

googlenewsNext

पणजी : मुजाहीद खान याच्या खून प्रकरणात अटक करून तुरुंगात टाकलेल्या सदीक बेलळ्ळारी याला कोठून दुर्बुद्धी सुचली आणि जामीनसाठी अर्ज केला. तो तुरुंगातच सुरक्षित आहे, असे   अतिरिक्त सरकारी अभियोक्ते आणि उपसॉलीसीटर जनरल प्रवीण फळदेसाई यांनी त्यांला न्यायालयातच सांगितले होते आणि घडलेही नेमके तसेच. रुमडामळ-हाऊसिंग बोर्ड येथील सदीक अहमद हा शुक्रवारी झोपला तो उठलाच नाही. तो झोपेत असताना कादर खान खानजादे आणि तौसिफ कदेमणी यांनी घरात घसून त्याला झोपेतच ठार मारले. आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेतल्याचे कादर खानने सांगूनही टाकले आहे. ज्याची भिती ॲड फळदेसाई यांनी न्यायालयात व्यक्त केली होती तेच घडून गेले आहे. 

सदीक बेळ्ळारी हा गुन्हेगारी पारश्वभुमीचा इसम होता आणि मुजाहीद खान याच्या खून प्रकरणात तो सहआरोपी होता. २८ मे २०२० रोजी रात्रीच्या या घटनेत मुजाहीद खान याच्या बरोबर असलेल्या जावेद पानवाले याच्यावर त्याने लोखंडी सळीने वार केला होता.  परंतु त्याच्याकडून सळी काढून घेण्यास जावेदला यश मिळाल्याने तो वाचला होता. परंतु त्याचा सहकारी मुजाहीदला सदीकचा सहकारी इस्माईल मुल्ला ऊर्फ शोटूने तोपर्यंत मुजाहीदला भोसकून ठार मारले होते.  या प्रकरणात दोघांनाही खुनाच्या गुन्ह्याखाली अटक क रण्यात आली होती. छोटू अजून तुरुंगात आहे, परंतु सदीकने जामीनसाठी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली होती. ॲड रायन मिनेझीस यांनी सदीकसाठी तर ॲड फळदेसाई यांनी त्याच्या जामीनला विरोध केला होता. मात्र चाकू हल्ला करून मुजाहीदचा खून करणारा हा छोटू असल्यामुळे सदीकला  न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. हा निवाडा १९ जून २०२३ रोजी न्यायमूर्ती कर्णीक यांनी सुनावला होता. 

‘सदीक तुरुंगातच सुरक्षित’
सदीकच्या जामीनला  हरकत घेताना ॲड फळदेसाई यांनी त्याला सोडल्यास तो या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रयत्न करील असे सुनाले होतेच, शिवाय सगीकच्या स्वत:च्या सुरक्षेसाठीही तो तुरुंगात असणेच अधिक चांगले असेही त्यावेळी न्यायालयात सांगितले होते.
 

Web Title: If Sadiq had stayed in jail, he would have been alive goa news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.