सांडपाणी नाल्यात सोडल्यास वीज-पाणी होणार बंद, मुख्यमंत्र्यांचा पणजीकरांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 03:37 PM2024-06-01T15:37:54+5:302024-06-01T15:40:05+5:30
स्मार्ट सिटीची ९० टक्के कामं पूर्ण
पणजी: पणजीत स्मार्ट सिटीचे कामे ९० टक्के झाली आहे. नवीन सांडपाणी पाईपलाईन पूर्ण करण्यात आली असून पणजीकरांनी सांडपाण्याची नवीन जाेडणी करुन घ्यावी. जे लाेक जाेडणी न घेता नाल्यात सांडपाणी साेडतात त्यांचे वीज आणि पाणी जाेडणी बंद केली जाणार असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी स्मार्ट सिटीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत पणजीचे आमदार मंत्री बाबूश मोन्सेरात, महापौर राेहीत मोन्सेरात, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्ज तसेच जलस्त्राेत खात्याचे मुख्य मुख्यअभियंते बदामी व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पणजीत जुन्या पाेर्तूगीज कालीन पाईपलाईन होत्या त्या दुरुस्त करण्यासाठी स्मार्ट सिटीचे काम सुरु हाेते. पणजी वासियांनी जून्या सांडपाण्याच्या पाईपलाईन बदलून तिथे नवीन सांडपाण्याची जाेडणी घ्यावी. सांतीनेज भागात अजूनही माेठ्या प्रमाणात लाेक सांतीनेज खाडीत सांडपाणी सोडतात त्यांनी ८ दिवसात सांडपाण्याची जाेडणी घेतली नाहीतर त्यांचे वीज आणि पाणी जाेडणी बंद करा असा आदेश आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे.
: सल्लागारांच्या चुकामुळे कामात उशीर
सल्लागारांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामात उशीर झाला आहे हे मुख्य डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्य केले. मुख्यमंत्री म्हणाले, लाेकांना स्मार्ट सिटीच्या कामाचा त्रास व अडचण झाली याचे आम्हाला दुख आहे. लोकांना त्रास देणे हा सरकारचा हेतू नव्हता पण पुढील २५ वर्षे पुन्हा अशा प्रकाराचा त्रास होणार नाही याची आम्ही दखल घेतली आहे. काही कामांना अशीर झाला आहे हे मान्य करतो. जी काही उर्वरीत कामे आहे ती येत्या आठवड्यात पूर्ण होणार आहे.
: पूराचे पाणी पंपाने काढणार
पणजी शहरातील पाणी न्याल्यामार्गे मांडवीत येत असते. या नाल्यात कचरा तसेच घाण साचून पणजीत पूर येतो तसेच भरतीच्या वेळी पणजी शहरात पाणी साचून पूर येत असतो. पण यंदा पूर येेउ नये यासाठी जलस्त्राेत खात्याला पंप मार्गाने पाणी काढण्याचे सांगितले आहे. तसेच मांडवीकिनारी नाल्याचा कचरा साचआ आहे तोही साफ करण्याचा आदेश दिला आहे.
: हाॅटमिक्स रस्ते फोडले जाणार नाही
स्मार्ट सिटीने पणजीत बहुतांश रस्ते हॉटमिक्स केेले आहे ते आता पुन्हा गॅस पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन, केबल तसेच इतर कामासाठी फाेडले जाणार नाही यासाठी वेगळी पाईपलाईन केली जाणार आहे. हे हॉटमिक्स केेलेले रस्ते किमान २५ वर्षे टिकावे यासाठी करण्यात आले आहेत. त्यामुळे पणजीकरांना काम पूर्ण झाल्याव पुन्हा अशा प्रकारचा त्रास हाेणार नसून सर्व सुविधा मिळणार आहे.