निकृष्ट दर्जाचे काम केल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करुन देण्यास भाग पाडू- CM प्रमोद सावंत

By किशोर कुबल | Published: June 19, 2024 04:43 PM2024-06-19T16:43:46+5:302024-06-19T16:44:23+5:30

स्मार्ट सिटीच्या कामांबाबत दिला इशारा

If substandard work is done, we will force the contractors to redo it says CM Pramod Sawant | निकृष्ट दर्जाचे काम केल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करुन देण्यास भाग पाडू- CM प्रमोद सावंत

निकृष्ट दर्जाचे काम केल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करुन देण्यास भाग पाडू- CM प्रमोद सावंत

किशोर कुबल, पणजी: स्मार्ट सिटीचे कोणतेही काम निकृष्ट दर्जाचे केलेले आढळून आल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करुन देण्यास भाग पाडू, असा इशारा मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांनी दिला. पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. 'स्मार्ट सिटीच्या कामाचा अहवाल तयार केला जाणार असून तो जाहीर करु,' असे आश्वासनही त्यांनी दिले. स्मार्ट सिटीची कामे लांबल्याने लोकांना जो त्रास झालेला आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलीगिरी व्यक्त केली. राजधानीच्या शहरात मलनिस्सारणाची मोठी समस्या होती. आता वाहिन्या टाकल्याने ती दूर हाईल. लोकांनी थोडेसे सहन करावेत, लवकरच कामे पूर्ण होतील, असा शब्द त्यांनी दिला.

 

Web Title: If substandard work is done, we will force the contractors to redo it says CM Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.