वय कमी असते तर लोकसभा निवडणूक लढविली असती; दिगंबर कामत यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:09 PM2024-02-14T16:09:32+5:302024-02-14T16:10:29+5:30
माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
नारायण गावस,पणजी: माझे आता वय हाेत चालले असल्याने मी देशपातळीवरील राजकारणाचा विचार करत नाही जर ५० वर्ष वय असते तर लाेकसभेसाठी तयार झालो असतो. मला आता ६५ वर्षे संपली आहे उरलेले राजकारण हे राज्यात राहूनच करायचे आहे असे माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. राजभवनर एका कार्यक्रमात पत्रकारांनी लाेकसभेच्या निवडणूकांवर विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
मला आता लाेकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नाही मला मडगावातील प्रत्येक घरातील व्यक्ती ओळखत आहे. त्यामुळे मला मडगाव वासियासाठी काम करायचे आहे. कॉँग्रेस साेडताना मला भाजपमध्ये मोठे मंत्रीपद मिळाले असते पण मी कधी यासाठी हट्ट केला नाही आता माझ्या नावाची लाेकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चा होत आहे. नावाची चर्चा ही होतच असते यात काही नव्हल नाही. मी राजकारणाचा सर्व अनुभव घेतला आहे. मुख्यमंत्रीपदही भूषविले आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळावे अशी इच्छा नाही. १९९४ पासून मडगावातून निवडून येत आहोत. मला आमच्या लाेकांसाठी काम करायचे आहे, असेही दिगंबर कामत म्हणाले.
आमदार कामत म्हणाले आता इंडिया युती राहिलेली नाही कॉँग्रेसचे काहीच अस्तित्व नाही त्यामुळे दक्षिण गाेव्यात भाजपचे उमेदवार माेठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. आम आदमी पक्षाचा उमेदवार जाहीर झाला असला तरी याचा भाजपला काहीच फरक पडणार नाही आमचे मतदार कार्यकर्ते हे भाजपलाच मतदान करणार आहे. असेही आमदार दिगंबर कामत म्हणाले.