पुष्पगुच्छ द्याल तर शिक्षा करू, पर्रीकरांनी सरकारी कर्मचाऱ्यांना बजावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 03:46 PM2017-09-08T15:46:46+5:302017-09-08T15:48:15+5:30

सरकारी कार्यालयांनी कुणालाच सोहळ्यावेळी पुष्पगुच्छ देऊ नये. फक्त एक फुल द्यावे. वारंवार सरकारने परिपत्रके जारी करून सरकारी कार्यालयांना बजावले आहे.

If you give a bouquet, you'll be punished. Parrikar told the government employees | पुष्पगुच्छ द्याल तर शिक्षा करू, पर्रीकरांनी सरकारी कर्मचाऱ्यांना बजावले 

पुष्पगुच्छ द्याल तर शिक्षा करू, पर्रीकरांनी सरकारी कर्मचाऱ्यांना बजावले 

Next

पणजी, दि. 8 - सरकारी कार्यालयांनी कुणालाच सोहळ्यावेळी पुष्पगुच्छ देऊ नये. फक्त एक फुल द्यावे. वारंवार सरकारने परिपत्रके जारी करून सरकारी कार्यालयांना बजावले आहे. मात्र त्या सूचनेचा पालन होत नाही. यापुढेही जर पुष्पगुच्छच सरकारी कार्यालयांनी दिले तर मात्र संबंधितांना शिक्षा करावी लागेल, असा इशारा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी येथे दिला.
पणजीतील कला अकादमीत तीन दिवसीय पर्यावरणविषयक सिनेमा महोत्सवाचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम शासकीय नव्हता पण मुख्यमंत्र्यांना आयोजकानी मोठा पुष्पगुच्छ दिला व स्वागत केले.
मुख्यमंत्री म्हणाले की निदान पर्यावरणाचा आग्रह धरणाऱ्यांनी फुले वाया घालवू नयेत किंवा कचर्‍याची निर्मिती करू नये. फक्त शब्दांनीच स्वागत करता आले असते. पुष्पगुच्छाला अनेकदा छोटे प्लास्टिकही लावले जाते. सरकारी कार्यालयेही वारंवार पुष्पगुच्छांचाच वापर करतात. हे पर्यावरणास पुरक नाही.
पर्रीकर म्हणाले की यापुढे जर सरकारी कार्यालयांनी पुष्पगुच्छ दिले तर शिक्षाच दिली जाईल. प्लास्टिकच्या बॅगांना तर आम्ही सर्वांनी मुठमातीच द्यायला हवी. गोवा सरकार यापुढे सरकारी कार्यक्रमांना प्लास्टिकचा वापर करणार नाही. सरकारी राजपत्रही यापुढे इलेक्ट्रोनिक रूपात दिले जाईल. कागदी रुपात राजपत्र उपलब्ध करून देणे हळूहळू बंदच केले जाईल.

Web Title: If you give a bouquet, you'll be punished. Parrikar told the government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.