यंदा इफ्फी 8 दिवसांचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 06:54 PM2016-07-25T18:54:39+5:302016-07-25T18:54:39+5:30
राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान होणा:या 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यंदा हा महोत्सव आठ दिवसच असेल
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २५ : राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान होणा:या 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यंदा हा महोत्सव आठ दिवसच असेल.
दरवर्षी 20 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असे, यंदापासून यातील दोन दिवस कमी केलेत. महोत्सवात 1 सप्टेंबर 2015 ते 31 ऑगस्ट 2016 या कालावधीतील तयार झालेले चित्रपट इंडियन पॅनोरमा विभागात पाठविण्यात येतील.
त्यासाठी चित्रपटांच्या प्रवेशिका मागविल्या आहेत. सेन्सॉर न झालेले चित्रपटही या विभागासाठी पाठविले जाऊ शकतात. इंडियन पॅनोरमासाठी पाठविण्यात येणा:या चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स असणो अत्यंत आवश्यक आहे. या प्रवेशिका केवळ ऑनलाईन सादर करण्याचा पर्याय आहे. ऑनलाईन अर्जाची सही व शिक्क्यासह छापील प्रत चित्रपट महोत्सव संचालनालयाकडे पाठवावी.
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2016 आहे. ऑनलाईन अर्जाची छापील प्रत स्वीकारण्याची अंतिम मुदत 13 सप्टेंबर अशी आहे. प्रवेशिका पाठविण्यास इच्छुक असलेल्यांसाठी खास सूचना ऑनलाईन वाचता येतील, असे चित्रपट संचालनालयाने वेबसाईटद्वारे सुचविले आहे. गोवा मनोरंजन संस्थेने इफ्फीसाठीची पूर्वतयारी सुरू केली आहे. यासाठी कार्यक्रम व्यवस्थापन एजन्सी मंडळासाठी निविदा जाहीर केल्या आहेत.