इफ्फी सजावटीचे काम शेवटच्या टप्प्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 05:06 PM2023-11-17T17:06:15+5:302023-11-17T17:06:55+5:30
इफ्फी निमित पणजीतील प्रमुख असा दयानंद बांदाेडकर रस्ता पूर्णपणे विद्यूत रोषणाईने सजविला जाताे.
( नारायण गावस)
पणजी: पणजी राजधानीत साेमवारी २० नोव्हेबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असल्याने तयारी शेवटच्या टप्प्यावर आली आहे. गाेवा मनोरंजन संस्थेच्या आवारात विद्यूत राेषणाई मंडप घालण्यात आले आहेत. तसेच इफ्फीचे आकर्षक असे पाेस्टर लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी विद्यूत राेषणाई घालण्याचे काम सुरु आहे.
इफ्फी निमित पणजीतील प्रमुख असा दयानंद बांदाेडकर रस्ता पूर्णपणे विद्यूत रोषणाईने सजविला जाताे. सध्या या मागार्वरही विद्यूत रोषणाई घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पणजी इफ्फी पोस्टर ठिकठिकाणी लावण्याचे काम युद्धपातळीवर आहे. तसेच अनेक ठिकाणी लहान दालनाचे पेंडल घालण्याचे काम केले जात आहे.
प्रतिनिधीची नोंदणी जोरात
यंदा मोठ्या प्रमाणात इफ्फीसाठी प्रतिनिधी नाेंदणी होत आहे. गेली दाेन वर्षे कराेनामुळे प्रतिनिधीची संख्या कमी होती पण या वर्षी प्रतिनिधी नाेंदणी चांगली हाेणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नाेंदणी दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा २५ हजारांच्या वर प्रतिनिधी येण्याची शक्यता आहे. या वर्षी विदेशी प्रतिनिधींची नोंदणी ही गेल्या वर्षीच्या नुलनेत जास्त होऊ शकते.
मुख्यमंत्र्याकडून आढावा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वता गोवा मनोरंजन सस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वेळोवेळी इफ्फीच्या तयारीचा आढवा घेतला जात आहे. मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा आमदार डिलायला लोबा या ही याचा आढावा घेत असून सर्व तयारी व्यवस्थित केली असल्याचे डिलायला लोबाे यांनी सांगितले आहे. इफ्फी निमित्त गाेव्यात येणाऱ्या प्रतिनिधींना सर्व ती सुरक्षा पुरविली जाणार असल्याचे तसेच कुठलीच कमतरता भासली जाणार नाही याची दखल घेतली जाईल असेही डिलायला लोबोंनी स्पष्ट केेले आहे.