इफ्फीत 'सिने मेळा' ठरतोय रसिकांचे आकर्षण; मांडवी तिरी विविध दालने
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:36 PM2023-11-23T16:36:14+5:302023-11-23T16:38:52+5:30
सिनेमाच्या इतिहासाचे दर्शन, गोमंतकीय खाद्य संकृतीचा आस्वाद
नारायण गावस : पणजी- गोवा: यंदा इफ्फीनिमित्त पणजीतील 'योग सेतू' येथे इफ्फीतील 'सिने मेळा' आयोजित केला असून हा राज्यभरातून इफ्फीसाठी येत असलेल्या रसिकांचे आकर्षण ठरला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी खरोखरच मेळा भरत असतो. मांडवी तिरी विविध दालने थाटण्यात आली आहे.
गोमंतकीय खाद्य संकृतीचा आस्वाद
यंदाच्या इफ्फीत देश विदेशातील आलेले प्रतिनिधींना अस्सल गोमंतकीय खाद्य संस्कृतीचा अस्वाद घ्यायला मिळवा. यासाठी याेग सेतू ठिकाणी राज्यातील विविध महिलामंडळांनी आपली दालने घातली आहेत. यात गोमंतकीय विविध खाद्य पदार्थ विकले जात आहेत. याचा फायदा प्रतिनिधी तसेच या ठिकाणी फिरायला आलेल्या लोकांना होत आहे. त्याच प्रमाणे इतर विविध हस्तकलेची दालने मांडली आहे. ते खरेदीसाठी लोक गर्दी करताना दिसतात.
सिनेमाच्या इतिहासाचे दर्शन
हा सिनेमेला २८ नोव्हेबर पर्यंत सुरु आहे. येथे चित्रपटांच्या इतिहासाचे दर्शन होत आहे. तेथे सिनेमाच्या इतिहासाचे दर्शन घडवणरे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी लाेकांना दुर्मिळ अशा चित्रपटाविषयी माहिती मिळत आहे. तसेच अनेक चित्रपट विषयीची पुस्तकाची दालनेही आहे. त्यामुळे लाेक या ठिकाणी फिरायला येतात त्यांना याचा आस्वाद मिळत आहे.
मनोरंजनांची साेय
ज्या स्थानिक गोमंतकीयांनी या इफ्फीत प्रतिनिधी पास केले नाही अशा लाेकांना आता इएसजी व आयनॉक्स मध्ये प्रवेश मिळत नाही अशा ालोकांना इफ्फीत मनाेरंजनाचे साधन म्हणून योग सेतू येथे आयोजित केलेल्या सिनेमेळाव्यात मनोरंजनाची सोय केली आहे. येथे माेठे स्टेज ाघातले असून ऑयनोक्स नसेच नृत्य गायन असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत. तसेच फाेटाे काढण्यासाठी विविध आकर्षक असे देखावे केले आहे.