इफ्फीत शाहीद कपूर, कॅटरिना कैफ सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 07:21 PM2017-11-16T19:21:49+5:302017-11-16T19:22:42+5:30
पणजी: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याच्या सोबतच यंदा ४८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री कॅटरिना कैफ या उपस्थित राहणार आहेत.
पणजी: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याच्या सोबतच यंदा ४८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री कॅटरिना कैफ या उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, सुशांत सिंग राजपूत तसेच मराठी चित्रपट उद्योगातील कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ईएसजी समोरील परिसरात इफ्फी नॅक्स्ट जॅन अॅट बायोस्कोप व्हीलेजचे (चित्रपट नगरी)उद्घाटन दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रद्धा कपूर यांच्या हस्ते होईल. उद्घाटनानंतर ७.३० वा. येथील तीनही सिनेमागृहामध्ये त्यांचा आशिकी २ हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल, असे तालक यांनी सांगितले. युवा आदर्श म्हणून श्रद्धा कपूर यांचा या वेळी गौरव करण्यात येईल.
कट्टा येथील संवादामध्ये अभिनेता नाना पाटेकर, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, सुशांत सिंग राजपूत, सई ताम्हणकर आदी मान्यवर सहभागी होईल. २५ व २६ रोजी मुलांसाठीचे चित्रपट प्रदर्शित केले जाईल. २६ रोजी एम एस धोनी हा चित्रपट शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित केला जाणार असून या वेळी या चित्रपटाचे अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांच्याबरोबर चर्चा करण्याची संधी मुलांना मिळणार असल्याची तालक यांनी माहिती दिली.
इफ्फी जेन नॅक्स्ट उपक्रमांमध्ये नविन चित्रपट निर्मात्यांसाठी ३ मिनीटांचे इफ्फीवर आधारीत इफ्फी नेवर सीन बिफोर संकल्पनेवर आधारित लघुपट तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली असून यासाठी दर दिवसाचा विजेता व एक विजेता जाहिर संपूर्ण स्पर्धेचा केला जाईल. या स्पर्धेत प्रत्येक व्यक्तीला दिवसाला एकच प्रवेश दिला जाईल.
बायोस्कोप व्हीलेजचा आनंद घेण्यासाठी दिवसाला ५० रू. प्रवेश शुल्क आकारले जाईल. ५० रू. मध्ये दिवसभरासाठी या विविध उपक्रमांचा आनंद घेता येईल असे तालक यांनी सांगितले. २१ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजे पर्यंत तर २२ ते २७ दरम्यान दुपारी १२ ते रात्री १२ वाजे पर्यंत बायोस्कोप व्हिलेज खुली राहील. २७ रोजी सायंकाळी ६ वाजता बायोस्कोप व्हीलेजचा समारोप सोहळा होईल या वेळी देखील दिग्गज कलाकार उपस्थित राहतील असे तालक यांनी सांगितले.
यंदा मराठी भाषेतील ९ चित्रपट इंडियन पॅनोरामा विभागात निवडले असून ही ऐतिहासिक गोष्ट आहे. तेव्हा एक चित्रपट बाहेर मारल्यामुळे निराश होण्याची गरज नाही असे सध्या ज्युरींचे राजिमाना सत्र सुरू असल्याविषयी प्रश्न विचारला तेव्हा तालक यांनी सांगितले.
सात हजार प्रतिनिधी नोंद -
आता पर्यंत इफ्फीसाठी ७१९१ प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. यातील ३९५२ प्रतिनिधींनी शुल्क दिले आहे. आता नोंदणी करणा-या प्रतिनिधींना उशिराचे शुल्क भरावे लागतील. मागच्या वर्षी ६ हजार प्रतिनिधी इफ्फीसाठी नोंद झाले होते असे तालक यांनी सांगितले. प्रसार माध्यमांचे ५५५ पत्रकारांनी नोंदमी केली असून ३०० जणांना मंजुरी मिळाली आहे असे तालक यांनी सांगितले.