इफ्फी उद्घाटनाला दिग्गज कलाकारांची लाभणार उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 05:11 PM2023-11-18T17:11:17+5:302023-11-18T17:12:08+5:30
प्रिथूल कुमार यांनी सांगितले की यंदाच्या इफ्फीमध्ये वल्ड प्रिमीयर, इंटरनेशनल प्रिमीयर, एशियन प्रिमीयर तसेच इंडियन प्रिमीयरमधील दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
नारायण गावस
पणजी: आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सोमवारी २० नोव्हेंबर पासून गाेव्यात सुरु हाेत असून यात उद्घाटनाला शाहिद कपूर, माधूरी दिक्षित, श्रिया सरन सारखे दिग्गज कलाकरांची उपस्थिती लाभणार आहे. मास्टर क्लाससाठी खास यंदा हॉलिवूड स्टार मायकल डोग्लास यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच जुरी प्रमुख म्हणून ज्येष्ट अभिनेते व चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची निवड झाली आहे, अशी माहिती एनएफडीसीचे व्यावस्थापकीय संचालक प्रिथूल कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो, मनोरंजन संस्थेच्या कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा, पीआयबीच्या संचालिका मानिदिपा मुखर्जी व पीआयबीच्या एडीजी डॉ. प्रग्या पालिवाल गौर उपस्थित होत्या.
प्रिथूल कुमार यांनी सांगितले की यंदाच्या इफ्फीमध्ये वल्ड प्रिमीयर, इंटरनेशनल प्रिमीयर, एशियन प्रिमीयर तसेच इंडियन प्रिमीयरमधील दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तसेच गाला प्रिमीयलमध्ये खास सलमान खान, सनी देओल सारखे कलाकार उपस्थिती लावणार आहे. त्याच प्रमाणे यंदा चित्रपटांची संख्याही वाढली आहे. खास फिल्म बाजारामध्ये विविध चित्रपट निर्माते सहभागी होणार आहे. मास्टर क्लाससाठी खास हॉलिवूड स्टार मायकल डोग्लास यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना लाभणार आहे.
गोवा मनाेरंजन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा यांनी सांगितले. यंदाच्या इफ्फीत प्रतिनिधींची संख्या जास्त असल्याने त्यांची वाहतूक व्यावस्था माेफत आहे. तसेच यंदा खास दिव्यांगासाठी साेयस्कर अशा सोयी आहेत. यामध्ये त्यांना व्हीलचेअर व अन्य साेयी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच यंदा गोमंतकीय ७ चित्रपट दाखविले जाणार आहे. तसेच खास लाेकांच्या मनोरंजनासाठी सिने मेलाचे आयाेजन केले असून यात चित्रपट प्रदर्शन असणार आहे, असे गोवा मनोरंजन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा यांनी सांगितले.