गोवा विद्यापीठात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष, अकादमीची कुलगुरूंकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 08:52 PM2017-09-21T20:52:10+5:302017-09-21T20:52:22+5:30
गोवा विद्यापीठात मराठी विषय घेऊन एमए शिकणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांकडे विद्यापीठ मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोमंतक मराठी अकादमीने केला आहे.
पणजी, दि. 21 - गोवा विद्यापीठात मराठी विषय घेऊन एमए शिकणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांकडे विद्यापीठ मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोमंतक मराठी अकादमीने केला आहे.
अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांच्यासह शिष्टमंडळाने कुलगुरू वरूण साहनी यांची गुरूवारी भेट घेतली. विद्यापीठात मराठी विषय शिकविण्यासाठी आवश्यक प्रमाणात प्राध्यापक पुरविले जात नाहीत. विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातो. येत्या सात दिवसांत ही स्थिती सुधारावी अशी मागणी मराठी अकादमीने कुलगुरूंना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान गोवा विद्यापीठात विविध विभागांमध्ये मिळून प्राध्यापकांच्या एकूण 44 टक्के पदे रिक्त आहेत. तसेच येत्या दोन वर्षांत आणखी 20 टक्के प्राध्यापक निवृत्त होणार आहेत पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही. सरकार पर्यायी व्यवस्थाच करू पाहत नाही, असे अकादमीचे म्हणणे आहे.