हरमल किनाऱ्यावर बेकायदा व्यवसाय

By Admin | Published: March 9, 2015 10:41 PM2015-03-09T22:41:13+5:302015-03-09T22:41:41+5:30

कोरगाव : हरमल किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लमाणी लोकांनी हैदोस घातला असून अंदाजे ५०० हून अधिक लमाणी लोक या समुद्रकिनाऱ्यावर कपडे,

Illegal business on Harmal shores | हरमल किनाऱ्यावर बेकायदा व्यवसाय

हरमल किनाऱ्यावर बेकायदा व्यवसाय

googlenewsNext

कोरगाव : हरमल किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लमाणी लोकांनी हैदोस घातला असून अंदाजे ५०० हून अधिक लमाणी लोक या समुद्रकिनाऱ्यावर कपडे, खोट्या सोन्याचे दागिने विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायाआडून अन्य प्रकारचे बेकायदेशीर प्रकार या ठिकाणी खुलेआम चालू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
समुद्रकिनाऱ्यापासूनच ५० मीटरवर हरमल पोलीस आउट पोस्ट आहे. येथे चाललेले सर्व प्रकार या आउट पोस्टच्या नजरेतून सुटणे शक्यच नाही, किंबहुना त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी लमाणी लोकांचे व्यवहार चालू
आहेत.
गेल्या वर्षी या लमाणी लोकांकडून पोलिसांना महिन्याकाठी ७० ते ९० हजारांचा हप्ता मिळत असल्याची चर्चा होती. या वर्षी हा आकडा वर चढल्याचे सांगितले जाते.
पर्यटन हंगाम संपत आला तरी येथील पोलिसांनी एकाही लमाण्याच्या विरोधात कारवाई केल्याचे उदाहरण नाही. अनेकवेळा स्थानिक लोकांनी हरमल आउट पोस्टचे प्रमुख साळगावकर, त्यांचे वरिष्ठ चोडणकर यांना वेळोवेळी सांगूनही काहीच कारवाई झालेली नाही. याचा अर्थच
या ठिकाणी लमाणी विक्रेत्यांना सगळे काही माफ आहे, असा स्थानिक
लावतात .
भरदिवसा हे लमाणी लोक विदेशी पर्यटकांना, त्यांच्या बाजूला बसून आपले कपडे विकण्याचा प्रयत्न करतात. हे केवळ निमित्त. अनेकदा या कपड्यांच्या आत काय लपले आहे हे लमाणी आणि पर्यटकांबरोबर येथील पोलिसांनासुद्धा ज्ञात आहे. या लमाणी लोकांकडे सर्रास तीन पिशव्या असतात. एकीत कपडे सामान, दुसरीत बांगड्या व अन्य वस्तू. मात्र, तिसऱ्या पिशवीत काय असते हे गुपित अजूनही कोणालाच कळलेले
नाही.
हरमल आउट पोस्टवर अनेक प्रकरणे येत असतात. त्यातील ९० टक्के प्रकरणे मध्यस्थी करून सोडविली जातात. या मध्यस्थीमुळे या भागात सर्वांचाच ‘विजय’ होत असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अशा अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना योग्य ती कडक कारवाई करण्याची मागणी येथील लोक करीत आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर अनेक कायदेशीर बाबी पूर्ण करून काही दुकानवाले आपली दुकाने थाटतात. दुसऱ्या बाजूने पोलिसांच्या सहकार्याने लमाणी लोक खुल्लम खुल्ला व्यवसाय करून या सनदशीर व्यवसायाला तोट्यात आणतात. अशा लोकांना सांभाळून घेणाऱ्या पोलिसांना ताकीद मिळावी, अशी मागणी या भागातील लोकांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे केली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Illegal business on Harmal shores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.