स्थानिकांच्या जागा हडपून बेकायदेशीर लोकवस्ती; आरजीपीचा सरकारवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 03:15 PM2023-10-20T15:15:36+5:302023-10-20T15:16:24+5:30
कांदाेळी परिसरात स्थानिक लाेकांच्या जागा या परप्रांतीय लोकांनी हडप करुन त्या जागी आता वस्ती झाली आहे.
पणजी : भाजप सरकारने बेकायदेशीर जामिनी हडप केल्या त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी कमिटी स्थापन केली असली तरी या एसआयटीकडून लोकांना न्याय मिळत नाही. दिखाव्यासाठी ही एसआयटी बसविली असून राज्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांकडून जागा हडप केली जात आहे. एसआयटी हाच सरकारचा मोठा स्कॅम असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केला
स्थानिक लाेकांच्या जमिनी हडप करुन कळंगुट मतदार संघातील कांदोळी परिसरात बेकायदेशीर परप्रांतीयांची लाेकवस्ती झाली आहे. या जाग्याचाी एसआयटीकडून काहीचा चौकशी केली जात नाही. याला कॉग्रेस तसेच भाजपचे सरकार जबाबदार आहे. वोट बॅंकसाठी परप्रांतीयांना बेकायदेशीर स्थायिक केले जात असल्याचा आरोप आरजीपीचे प्रमुख मनाेज परब यांनी पत्रकार परिषदेत केला.
कांदाेळी परिसरात स्थानिक लाेकांच्या जागा या परप्रांतीय लोकांनी हडप करुन त्या जागी आता वस्ती झाली आहे. हे स्थानिक लोक आपल्या जाग्यासाठी गेली अनेक वर्षे न्यायासाठी लढा देत आहे पण त्यांना कसलाच दिलासा मिळत नाही. तत्कालीन कॉग्रेसचे आमदार तसेच आता भाजपचे आमदार मायकल लाेबो यांचा परप्रांतीयांना पाठींबा आहे. गेली अनेक वर्षे हे लोक या ठिकाणी वस्ती करुन आहे. या लोकांना राजकारण्यांच्या दबावामुळे स्थानिक पंचायत तसेच सरकारी कार्यालयांनी ना हरकत दाखला दिले आहे. पण आरजीपी या विरोधात आवाज काढणार आहे. या डबल इंजिनच्या सरकारला स्थानिकांचे काहीच पडलेले नाही, असे परब म्हणाले.
या कॉग्रेस तसेच भाजप पक्षाला मते महत्वाची आहे. त्यामुळे ते स्थानिकांच्या जागा परप्रांतीयांना देत आहे. गोव्यात सवत्र अशा बेकायदेशीार वस्ती असून तिथे गुंडागर्दी सुरु आहे. अनेक गुन्हे या लोकवस्तीत घडत असून याकडे सरकारचे लक्ष नाही. कुळंगुट कांदाेळीत लमाण्यांची लोकवस्ती माेठ्या प्रमाणात असून आमदार मायकल लोबो यांचा त्यांना पाठींबा आहे. त्यांच्या मतामुळे लोबो निवडणूकीत निवडून येत आहे. पण स्थानिक लाेक आता आपल्या जाग्यासाठी लढा देत असल्याने त्यांना आरजीपी न्याय देणार, असे मनोज परब यांनी सांगितले.