फेरीबोट भाडेवाढीची अधिसूचना त्वरित मागे घ्या; आपचे नदी परिवहन खात्याला निवेदन
By पूजा प्रभूगावकर | Published: November 7, 2023 01:38 PM2023-11-07T13:38:42+5:302023-11-07T13:39:29+5:30
याविषयी आप ने नदी परीवहन खात्याला निवेदन सादर केले.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: फेरीबोट भाडेवाढीची अधिसूचना त्वरित मागे घ्यावी. महसूल वाढवण्यासाठी लोकांकडून सरकारने पैसे वसूल करु नये अशी मागणी आमआदमी (आप) पक्षाने केली आहे.
याविषयी आप ने नदी परीवहन खात्याला निवेदन सादर केले. फेरीबोट भाडेवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे. १६ नोव्हेंबर पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. त्यापूर्वी या भाडेवाढी बाबत जारी केलेली अधिसूचना त्वरित मागे घ्यावी. सरकारने त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही आप ने केली.
आप नेता वाल्मिकी नाईक म्हणाले, की नदी परिवहन खात्याकडे विविध जलमार्गांवर ३१ फेरी बोट कार्यरत आहेत. यापैकी केवळ आठ फेरीबोटीच नव्या आहेत. तर उर्वरीत २५ ते ३० वर्ष जुन्या आहेत. २०१२ साला पासून सरकारने एककी नवी फेरीबोट खरेदी केलेली नाही. नव्या फेरीबोटी खरेदी करण्यासाठी तसेच खात्याचा महसूल वाढवण्यासाठी सरकार फेरीबोट भाडेवाढ करीत असल्याचे संबंधीत खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले. नव्या फेरीबोटी या सरकारने घ्याव्याच. मात्र त्यासाठी लोकांकडून पैसे वसूल करणे योग्य नाही. दुचाकींना प्रती महिना १५० रुपये व चारचाकी वाहनांना ६०० रुपये इतका शुल्क हा फार जास्त असल्याची टीका त्यांनी केली.