पणजीत पे पार्किंगची अंमलबजावणी लांबणार; महापालिका बैठकीत वेग वेगळ्या विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:05 PM2020-01-17T23:05:27+5:302020-01-17T23:06:02+5:30

मिरामार येथे बेकायदेशीर रित्या डॉल्फिन राइड तसेच जलसफरी करणाऱ्या  बोटींचे परवाने रद्द करण्याची मागणी करणारा ठराव महापालिकेत घेण्यात आला.

Implementation Pay Parking will be delayed in Panji; Discussion on different topics in municipal meetings | पणजीत पे पार्किंगची अंमलबजावणी लांबणार; महापालिका बैठकीत वेग वेगळ्या विषयांवर चर्चा

पणजीत पे पार्किंगची अंमलबजावणी लांबणार; महापालिका बैठकीत वेग वेगळ्या विषयांवर चर्चा

Next

पणजी : पे पार्किंग कंत्राटदाराने हमी रकमेच्या बाबतीत काही सवलती मागितल्याने राजधानी शहरात पे पार्किंगचे घोडे पुन्हा अडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी महापालिकेच्या मासिक बैठकीत हा विषय आला. बँक गॅरंटी आणि हमी रक्कम तीन वर्षऐवजी वर्षभराची भरतो, असा पवित्रा कंत्राटदाराने घेतला आहे. वास्तविक पे पार्किंग येत्या महिन्यापासून सुरुवात सुरू होणार होते परंतु या नव्या प्रकरणाने ते पुन्हा लांबण्याची शक्यता आहे.

महापौर उदय मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांचे एकूण १ लाख ६२ हजार रुपये कंत्राट आहे आणि सध्या ठरल्याप्रमाणे 60 टक्के बँक गॅरंटी म्हणजे 96 लाख रुपये आणि 10 टक्के सुरक्षा हमी रक्कम म्हणजे 18 लाख रुपये कंत्राटदाराने भरावे लागतात. मात्र त्यांचे म्हणणे असे आहे की एक वर्षाचे ५० लाख रुपये तो भरू शकेल हा त्याचा प्रस्ताव महापालिका बैठकीत चर्चेला असता तीन वर्षाची एकदम रक्कम भरण्याचे बाबत महापालिका ठाम राहिली. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आता पे पार्किंगचे काम  अडल्यास ते एप्रिल उजाडू शकतो.

दरम्यान, मिरामार येथे बेकायदेशीर रित्या डॉल्फिन राइड तसेच जलसफरी करणाऱ्या  बोटींचे परवाने रद्द करण्याची मागणी करणारा ठराव महापालिकेत घेण्यात आला. या बोटी बेकायदेशीररित्या कार्यरत आहेत आणि त्या बंद करण्याचे ठरले. मार्केटमधील गाळेधारकांच्याकडे भाडे करार करण्यासाठी 5 फेब्रुवारी रोजी महापालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.  सर्व कायदेशीर दस्तऐवज आहेत त्यांच्याकडे करार केले जातील.

लोकोत्सवाचा कचरा उचलणे बंद

दरम्यान, लोकोत्सवात प्लास्टिक बंदी असतानाही पालन न केल्याबद्दल महापालिकेने कठोर पवित्रा घेत काल शुक्रवारपासून तेथील कचरा उचलणे बंद केले महापौर म्हणाले की खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर प्लास्टिक बशा तसेच अन्य साहित्य वापरण्याचे प्रकार चालूच आहेत या स्टॉलधारकांना स्टील बशा वापरण्याचे निर्देश दिले होते. तेथे सुमारे एक टन कचरा रोज निर्माण होतो तो आम्ही उचलणे बंद केले आहे असे त्यांनी सांगितले.

कुंकळेयकर यांनी पोलीस तक्रार करावी -महापौर गरजले

दरम्यान,  हिरा पेट्रोल पंप येथील कचरा प्रकल्पाला मुद्दामहून आग लावल्याचा आरोप करणाऱ्या माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांनी नावे माहित असतील तर पोलिस स्थानकात तक्रार करावी, असे आव्हान महापौर उदय मडकईकर यांनी दिले आहे. मडकईकर म्हणाले की, उलट मनुष्यबळ विकास महामंडळाने या कचरा प्रकल्पातील दोन सुरक्षा रक्षक मागे घेण्यात येत असल्याचे कळविले आहे. आगीची घटना घडली त्या दिवशी सुरक्षारक्षक जागेवर नव्हता.

Web Title: Implementation Pay Parking will be delayed in Panji; Discussion on different topics in municipal meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा