नागरिकत्व शिक्षणावर शालेय कार्यक्रम महत्वाचे : शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 04:42 PM2024-03-04T16:42:34+5:302024-03-04T16:43:06+5:30

संचालक शैलेद्र झिंगडे म्हणाले, नागरिकत्व शिक्षणावर शालेय कार्यक्रम महत्वाचे आहे.

Importance of school programs on citizenship education: Director of Education Shailedra Zingde's opinion | नागरिकत्व शिक्षणावर शालेय कार्यक्रम महत्वाचे : शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांचे मत

नागरिकत्व शिक्षणावर शालेय कार्यक्रम महत्वाचे : शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांचे मत

पणजी (नारायण गावस): तरुणांना जबाबदार नागरिक बनवण्याच्या आणि देशाप्रती देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने देश अपनायेन सहयोग फाऊंडेशनने राज्यातील सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये नागरिकत्व शिक्षण आणि नागरी सहभागावर शालेय कार्यक्रम सुरू केला आहे. या वर्षी तो राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्येही वाढवण्यात आला, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी दिली. देश अपनायेन सहयोग फाऊंडेशनने तसेच शिक्षण खाते यांच्या संयीक्त विद्यामाने आयाजत केलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदे ते बालत हाते. यावेळी त्यांच्या साबेत देश अपनायेन सहयोग फाऊंडेशनचे संचालक निखिल म्हात्रे, प्रकल्प संचालक डॉ. शंभु घाडी उपस्थित होते.

संचालक शैलेद्र झिंगडे म्हणाले, नागरिकत्व शिक्षणावर शालेय कार्यक्रम महत्वाचे आहे. तरुणांमध्ये देशासाठी मालकीची भावना निर्माण करणे आणि प्रेरित करणे तसेच सक्रिय नागरिक म्हणजेच ॲक्टिझन्स विकसित करणे हा यामागचा उद्देश आहे.  नवीन शैक्षणिक धोरणासाठीही यांचा फायदा होणार आहे. शालेय स्तरावरील नागरी शिक्षणाला पूरक ठरेल आणि मुलांमध्ये राष्ट्रवाद आणि नागरिकत्वाची भावना जागृत करेल.

निखिल म्हात्रे म्हणाले देश अपनायेनने मुंबईच्या शाळांमध्ये आपले कार्य सुरू केले आणि सर्व आघाडीच्या शाळांसोबत भागीदारी करून त्यांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या २०२१ मध्ये देश अपनायेन यांनी सरकारसोबत सामंजस्य करार केला. गोव्यातील सर्व सरकारांसाठी ॲक्टिझन्स क्लब कार्यक्रम राबविणार आहे. कालच्या कार्यक्रमात ३१५ अनुदानित शाळा, ७८ सरकारी शाळा तसेच ९८ उच्च माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला आहे.
 

Web Title: Importance of school programs on citizenship education: Director of Education Shailedra Zingde's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा